मुंबई २० अंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:06 AM2020-12-29T04:06:45+5:302020-12-29T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रविवारी सर्वात किमान तापमान गोंदिया येथे ९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात रविवारी सर्वात किमान तापमान गोंदिया येथे ९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान २०.४ अंश नोंदविण्यात आले आहे. तर मुंबईचे कमाल तापमान ३०.९ अंश नोंदविण्यात आले आहे. कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविण्यात येत असले तरी येथील वातावरणात गारठा कायम असल्याने मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येत आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले आहे. २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान राज्यात हवामान कोरडे राहील. २८ आणि २९ डिसेंबर रोजी मुंबईत आकाश मोकळे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.