Join us

मुंबई २२ अशांवर: कोकणच्या तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रविवारी मुंबईचे किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रविवारी मुंबईचे किमान तापमान २२ तर कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, कोकणातील तापमानात वाढ होत असल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.

हवामान खात्याकडील माहितीनुसार, रविवारी मुंबईचे कमाल तापमान सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत तीन अंशानी वाढले आहे, तर किमान तापमान सर्वसाधारण तापमानाच्या तुलनेत पाच अंशांनी वाढले आहे. मुंबईत गरम दिवसाची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त संपूर्ण कोकणात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे.

यात डहाणू, ठाणे, मुंबई, अलिबाग, रत्नागिरीचा समावेश आहे. येथील कमाल तापमान ३० ते ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ किमान तापमान २० अंशाच्या आसपास राहणार असले तरी त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात वाढ होईल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.