पारा चाळीशी पार! मुंबई ३६ तर वाशिम ४३, उष्णतेची लाट कायम
By सचिन लुंगसे | Published: April 27, 2024 07:13 PM2024-04-27T19:13:11+5:302024-04-27T19:14:24+5:30
रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील.
मुंबई : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ तर वाशिमचे ४३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. रविवारी कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असून, तापमान ३८ ते ४० अंशाच्या घरात राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. हवामान उष्ण आणि दमट राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २७ अंशाच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
कमाल तापमान
वाशिम ४३
चंद्रपूर ४२.८
नांदेड ४२.४
गडचिरोली ४२
सोलापूर ४२
मालेगाव ४२
धाराशीव ४१.८
यवतमाळ ४१.७
परभणी ४१.५
अकोला ४१.४
वर्धा ४१.४
बीड ४१.२
जळगाव ४०.२
सांगली ४०.५
नाशिक ४०.१
अमरावती ४०
अहमदनगर ३९.८
ठाणे ३९.४
नागपूर ३९.७
छत्रपती संभाजीनगर ३९.२
सातारा ३९.१
बुलडाणा ३९
कोल्हापूर ३८.७
गोंदिया ३७.६
मुंबई ३६.६