Join us

पारा चाळीशी पार! मुंबई ३६ तर वाशिम ४३, उष्णतेची लाट कायम

By सचिन लुंगसे | Published: April 27, 2024 7:13 PM

रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील.

मुंबई : मुंबईसह राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसत असून, शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३६ तर वाशिमचे ४३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. रविवारी कोकणात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार असून, तापमान ३८ ते ४० अंशाच्या घरात राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. हवामान उष्ण आणि दमट राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २७ अंशाच्या आसपास राहील. मध्य महाराष्ट, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हयांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.

कमाल तापमानवाशिम ४३चंद्रपूर ४२.८नांदेड ४२.४गडचिरोली ४२सोलापूर ४२मालेगाव ४२धाराशीव ४१.८यवतमाळ ४१.७परभणी ४१.५अकोला ४१.४वर्धा ४१.४बीड ४१.२जळगाव ४०.२सांगली ४०.५नाशिक ४०.१अमरावती ४०अहमदनगर ३९.८ठाणे ३९.४नागपूर ३९.७छत्रपती संभाजीनगर ३९.२सातारा ३९.१बुलडाणा ३९कोल्हापूर ३८.७गोंदिया ३७.६मुंबई ३६.६

टॅग्स :मुंबई