मुंबईत अतिजोखमीच्या गटातील ४४ टक्के व्यक्ती,

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 03:33 AM2020-12-10T03:33:48+5:302020-12-10T03:34:40+5:30

Coronavirus in Mumbai : मुंबईत ६ डिसेंबरला एकूण ८ हजार ११८ व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ५६४ व्यक्ती हाय रिस्क कॉन्टॅक्ट असल्याचे समोर आले.

In Mumbai, 44 per cent of the people in the high-risk group, | मुंबईत अतिजोखमीच्या गटातील ४४ टक्के व्यक्ती,

मुंबईत अतिजोखमीच्या गटातील ४४ टक्के व्यक्ती,

Next

मुंबई : काेराेना रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्यात ४४ टक्के व्यक्ती अतिजोखमीच्या आजारांच्या गटातील आहेत. या व्यक्तींच्या कोरोना चाचण्या केल्या असता त्यातील १४ टक्के व्यक्ती या कोराेना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यांना पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार घरगुती व संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

मुंबईत ६ डिसेंबरला एकूण ८ हजार ११८ व्यक्तींची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ५६४ व्यक्ती हाय रिस्क कॉन्टॅक्ट असल्याचे समोर आले. ३ हजार ५५४ व्यक्ती लो रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचे आढळले. यावरून मुंबईत बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा आकडा वाढताना दिसत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून मुंबईत आतापर्यंत ४० लाख ८१ हजार ३११ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील १७ लाख ८७ हजार ९०१ (४४%) व्यक्ती हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याचे समोर आले, तर २ लाख ८६ हजार ३११ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. एकूण रुग्णांपैकी २२ लाख ९३ हजार ४१० व्यक्ती (५६%) लो रिस्कमध्ये असल्याचे पालिकेने अहवालात म्हटले आहे.
मुंबईत सध्या ४ लाख ७० हजार ३३५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३६ लाख १० हजार ४८१ व्यक्तींनी आपला क्वारंटाईन काळ पूर्ण केला आहे. आतापर्यंत १ लाख ६० हजार ८४ व्यक्तींना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाटईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले असून सध्या त्यातील ४९५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

प्रत्येक संशयिताची तपासणी
काेराेनाची संभाव्य दुसरी लाट थोपविण्यासाठी कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला आहे. बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या तसेच प्रत्येक संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत बाधितांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत असून त्यात लक्षणविरहित रुग्ण अधिक असल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

Web Title: In Mumbai, 44 per cent of the people in the high-risk group,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.