मुंबईत ७३३ रुग्ण, तर १९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:14+5:302021-06-22T04:06:14+5:30

मुंबई - मुंबईत दिवसभरात ७३३ रुग्ण आणि १९ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. परिणामी, शहर उपनगरात बाधितांची संख्या ७ ...

In Mumbai, 733 patients, 19 died | मुंबईत ७३३ रुग्ण, तर १९ मृत्यू

मुंबईत ७३३ रुग्ण, तर १९ मृत्यू

Next

मुंबई - मुंबईत दिवसभरात ७३३ रुग्ण आणि १९ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. परिणामी, शहर उपनगरात बाधितांची संख्या ७ लाख २१ हजार ३७० झाली असून, मृतांचा आकडा १५ हजार २९८ झाला आहे. सध्या १४ हजार ८०९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहर उपनगरात दिवसभरात ६५० रुग्ण बरे झाले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८८ हजार ९९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत दिवसभरात २८ हजार २२६ चाचण्या करण्यात आल्या असून, एकूण ६८ लाख १५ हजार २८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे. १३ ते १९ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.०९ टक्के आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ७२६ दिवसांवर गेला आहे. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात १५ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८० इतकी आहे. मागील चोवीस तासात पालिकेने रुग्णांच्या संपर्कातील ७ हजार ३८८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

Web Title: In Mumbai, 733 patients, 19 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.