Join us

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ७३६ नवे रुग्ण, ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. मुंबईत गुरुवारी एकूण ७३६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. मुंबईत गुरुवारी एकूण ७३६ नव्या कोरोना रुग्णांची नाेंद झाली असून ४ मृत्यू झाले. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ३ लाख १६ हजार ४८७ इतकी झाली आहे. तर दिवसभरात ४७३ रुग्ण बरे झाले.

मुंबईत आतापर्यंत २ लाख ९७ हजार ९९५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण ११ हजार ४३० मृत्यूंची नाेंद झाली. मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९४ टक्के इतका आहे. गेल्या ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचा ग्रोथ रेट ०.१७ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे १७ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत ३० लाख ८० हजार ५२८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता महाराष्ट्रातील अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.