Join us

मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ८४९ रुग्ण, २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी काेराेनाचे ८४९ रुग्ण आढळले असून २ मृत्यूंची नाेंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मंगळवारी काेराेनाचे ८४९ रुग्ण आढळले असून २ मृत्यूंची नाेंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा ३ लाख २७ हजार ६१९ वर पोहोचला असून, एकूण बळींची संख्या ११ हजार ४७६ झाली आहे. ९०३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होणाऱ्यांची संख्या ३ लाख ५ हजार ६३९ वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या ९६३३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी २४२ दिवस आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ११ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर १४५ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत ३३ लाख १० हजार १९० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.