लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शुक्रवारी दिवसभरात ४१५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. चार रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१३ टक्के एवढा आहे. दिवसभरात ३०२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ९४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ११,३८२ एवढा आहे. बाधितांची एकूण संख्या ५५० दिवसांनंतर दुप्पट होत आहे.
सध्या पाच हजार ५९७ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत दोन लाख ९३ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या चार कोरोना रुग्णांपैकी तीन रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी तीन रुग्ण पुरुष आणि एक रुग्ण महिला होती. मृत्यू झालेल्या चारपैकी तीन रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. तर एक रुग्ण ४० ते ६० या वयोगटातील होती. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण बाधित रुग्णांचा आकडा तीन लाख दहा हजार १२ एवढा आहे. तर आतापर्यंत २८ लाख ७९ हजार ८३५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
.................