Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:18 PM2024-07-22T12:18:08+5:302024-07-22T12:21:24+5:30

अपघातानंतर पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

Mumbai Accident Another hit and run case in city Speeding Audi collides with two rickshaws 4 passengers injured | Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

Mumbai Accident: मुंबईत पुन्हा हिट अँड रन; भरधाव ऑडीची दोन रिक्षांना धडक, ४ प्रवासी जखमी

Mumbai Audi Accident ( Marathi News ) : राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच राजधानी मुंबईत पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. आज सकाळी साडे सहा वाजता शहरातील मुलुंड डंपिंग रोड येथे भरधाव ऑडीने दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून ऑडी चालक फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ऑडीने मुलुंडमध्ये दोन रिक्षांना जोरात धडक दिली. यातील एका रिक्षात दोन प्रवासी होते. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघातानंतर ऑडी कार तेथेच सोडून चालक पळून गेला आहे. पोलिसांनी ऑडी ताब्यात घेतली असून अधिक तपास केला जात आहे.

वरळीतही घडली होती भीषण घटना

मुंबईतील वरळी इथं बीएमडब्ल्यू कार चालकाने दुचाकीला धडक देत एका मासळी विक्रेत्या महिलेला २ किमी फरफटत नेलं होतं. त्यात तिचा मृत्यू झाला होता. मिहीर शहा असे कारचालकाचे नाव असून त्याने अपघातानंतर थांबण्याचे सौजन्य न दाखवता बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेचा जीव घेतला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे.

Web Title: Mumbai Accident Another hit and run case in city Speeding Audi collides with two rickshaws 4 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.