Join us

Corona Vaccination: शंभर टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:19 AM

३२ लाख ५३ हजार नागरिकांचा दुसरा डोस शिल्लक

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शंभर टक्के मुंबईकरांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेने गाठले आहे. शनिवारी दुपारीपर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची नोंद ‘कोविन’ ॲपवर झाली आहे. तर ५९ लाख ८३ हजार ४५२ नागरिकांंनी दोन्ही डोस घेतलेे आहेत. लस घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेरील नागरिकांचाही समावेश आहे.मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १८ वर्षांवरील एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले, गर्भवती महिला, स्तनदा माता, अंथरुणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांचेच लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेत पालिका आणि सरकारी केंद्रांबरोबरच खाजगी रुग्णालयांनीही मोठे योगदान दिले.११ महिन्यांत गाठली शंभरीnलसीकरण मोहिमेच्या मार्गात महापालिकेला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. कोविन ॲपमधील गोंधळ, लसींच्या अपुऱ्या साठ्याअभावी थंडावणारी मोहीम, जागतिक स्तरावर निविदा मागवून लस खरेदी करण्यात आलेल्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. तरीही मोहीम सुरू राहिल्याने अखेर ११ महिन्यांमध्ये महापालिकेने पहिल्या डोसची शंभरी गाठली आहे. १८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५००पहिला डोस घेणारे - ९२ लाख ३९ हजार ९०२ (काही मुंबईबाहेरील नागरिकांचा समावेश)दुसरा डोस घेणारे - ५९ लाख ८३ हजार ४५२दुसरा डोस शिल्लक  - ३२ लाख ५३ हजार ४८प्रभावी लसीकरणामुळे प्रसार नियंत्रणातसप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात येत होता. नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र मधल्या काळात लसीकरण मोहीम थंडावल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस आता जानेवारी २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस