स्वच्छ भारत सर्वेक्षणात मुंबईला पुन्हा हुलकावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:03 AM2020-08-21T04:03:15+5:302020-08-21T04:03:36+5:30

नवी मुंबईने तिसºया स्थानावर झेप घेतली आहे, तर ठाणे शहराने देशपातळीवर १४ वा, तर कल्याण-डोंबिवलीने २२ वा क्रमांक मिळवला आहे.

Mumbai again excluded in Swachh Bharat Survey | स्वच्छ भारत सर्वेक्षणात मुंबईला पुन्हा हुलकावणी

स्वच्छ भारत सर्वेक्षणात मुंबईला पुन्हा हुलकावणी

Next

मुंबई : स्वच्छ भारत अभियानात सर्वोच्च स्थान मिळविण्याकरिता धडपडणाऱ्या मुंबई महापालिकेला यंदाही यशाने हुलकावणी दिली आहे. पंचतारांकित रेटिंगसाठी प्रयत्न करणाºया मुंबईला ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२०’मध्ये ३५ वा क्रमांक मिळाला आहे. नवी मुंबईने तिसºया स्थानावर झेप घेतली आहे, तर ठाणे शहराने देशपातळीवर १४ वा, तर कल्याण-डोंबिवलीने २२ वा क्रमांक मिळवला आहे.
केंद्र सरकारमार्फत दरवर्षी घेण्यात येणाºया स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत स्वच्छ शहराचा दर्जा निश्चित केला जातो. गेल्या वर्षी या अभियानात जागतिक दर्जाच्या मुंबई शहाराचा ४९ वा क्रमांक आला होता. त्यामुळे गेले वर्षभर घराघरातून कचरा गोळा करणे, ओला व सुका कचरा यावर प्रक्रिया असे उपक्रम महापालिकेने राबविले. मात्र १९ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात मुंबईला शून्य रेटिंग देण्यात आले.
>अशी सुरू आहे पीछेहाट
सन २०१६ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली त्या वेळेस मुंबई दहाव्या क्रमांकावर होती. २०१८ मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ राजधानीचे शहर म्हणून मुंबईने क्रमांक मिळवला होता. मात्र २०१९ मध्ये मुंबई ४९ व्या क्रमांकावर फेकली गेली.
पंचतारांकित रेटिंगचे निकष
पंचतारांकित रेटिंगसाठी शहर हागणदारीमुक्त असणे आवश्यक आहे. तसेच किती सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत? किती वेळ सार्वजनिक ठिकाणी झाडलोट होते? या सर्व मुद्द्यांचा समावेश असतो. मुंबई हागणदारी मुक्त शहर म्हणून यापूर्वीच जाहीर झाले आहे. मात्र स्वच्छतागृहांची कमतरता ही मुंबईतील मोठी समस्या आहे. ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण मुंबईत पूर्ण क्षमतेने केले जात नाही.
>नवी मुंबईचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक
‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात तृतीय क्रमांक मिळविला असून, राज्यातील पहिला क्रमांक कायम राखला आहे. देशात सातव्या क्रमांकावरून तिसºया क्रमांकावर झेप घेऊन स्वच्छता अभियानावर पुन्हा एकदा ठसा उमटविल्यामुळे महानगरपालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात सातवा क्रमांक मिळविला होता.
स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार नवी मुंबईकरांना समर्पित करीत आहोत.
- अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
>ठाणे जिल्ह्याची पहिल्या २५ मध्ये आघाडी
केंद्र सरकारने घेतलेल्या स्वच्छता अभियानात ठाणे जिल्ह्यातील शहरांनी आघाडी घेत मुंबईला मागे टाकले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वसई-विरार महापालिका यादीत ३२ व्या क्रमांकावर असून राज्याची राजधानी मुंबईची घसरगुंडी उडाली आहे.
स्वच्छ अभियानात ठाणे शहराने ४,६०६.३५ गुण मिळवून देशात १४ वा क्रमांक मिळवला असून, राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेने ४,०९१ गुण मिळवून २२ वा क्रमांक मिळवला आहे. वसई-विरार महापालिकेने ३,२६८.६७ गुण मिळवून ३२ वा क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने ३,१०६.३९ गुण मिळवून ३५ वा क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षी ३० व्या क्रमांकावर असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेने देशात १८ वा क्रमांक मिळवला आहे.

Web Title: Mumbai again excluded in Swachh Bharat Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.