मुंबई : अटीतटीच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महिलाशक्ती पुन्हा उजळून निघाली आहे. आरक्षण असलेल्या ११४ जागांव्यतिरिक्त १२ खुल्या प्रवर्गांतून पुरुष उमेदवारांना मागे टाकत महिलांनी बाजी मारली आहे़ यामुळे २०१२च्या तुलनेत महिलांच्या आणखी पाच जागा वाढल्या आहेत. २२७ पैकी १२६ जागांवर महिला निवडून आल्या आहेत़ यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता कोणाचीही असली तरी आवाज मात्र महिलांचाच घुमणार आहे़२०१२च्या महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले. यामुळे ११४ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या, तरीही सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गातही महिलांना उमेदवारी दिली. यामुळे १०६ पुरुष नगरसेवक तर १२१ महिला नगरसेवक निवडून आल्या होत्या़ या वेळेस आरक्षित प्रभागांतून १०८६ महिला उमेदवार असून ८० खुल्या प्रभागांतूनही महिलांना उमेदवारी मिळाली होती़ सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गातही महिलांनाच प्राधान्य दिले़ पक्षाने दाखविलेला हा विश्वास महिलांनीही सार्थकी ठरवीत विजय मिळवला आहे़ २०१२ मध्ये महिलांच्या सात जागा खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या़ या वेळेस ही ताकद आणखी वाढून १२ महिला नगरसेवक खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत़ यामध्ये काही दिग्गज महिला नगरसेवकांचाही समावेश आहे़ मात्र महिलांची ताकद वाढली आहे. त्याप्रमाणे प्रशासनाला धारेवर धरण्यात व नागरी समस्या सोडविण्यातही त्या आघाडीवर असतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)निवडणुकीत महिलाही ‘बाहुबली’महापलिकेत सत्ता कोणत्याही पक्षाची येवो मात्र सत्तेचा आधारस्तंभ महिलाच असणार आहेत. यंदाच्या पालिका निवडणुकीत अर्ध्याहून अधिक महिलाच निवडून आल्या असून त्यांनी ‘बाहुबली’असल्याचे सिध्द केले आहे. यात एन वॉर्डमधूनही निवडून आलेल्या महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. ‘एन’ वॉर्डमधून निवडून आलेल्या उमेदवार (डावीकडून उजवीकडे) रुपाली आवळे (शिवसेना), स्नेहल मोरे (अपक्ष), अर्चना वाघमारे (मनसे), ज्योती खान (राष्ट्रवादी) आणि राखी जाधव (राष्ट्रवादी). खुल्या प्रवर्गातील महिलांची उमेदवारी११३ पैकी ८० खुल्या प्रभागांत महिलांना उमेदवारी देण्यात आली़ यापैकी ३४ महिला घराणेशाही अथवा राजकारणात सक्रिय असलेल्या होत्या़ महिलांसाठी नव्हे मात्र मागासवर्गीयांसाठी आरक्षण असलेल्या ३० पैकी १८, अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव असलेल्या आठपैकी सहा तर कोणतेही आरक्षण नसलेल्या ७५ खुल्या प्रभागांतून २० महिला निवडणुकीच्या रिंगणात होत्या़अशी वाढली महिलाशक्ती२०१२ मध्ये २२७ पैकी १०६ पुरुष तर १२१ महिला नगरसेवक निवडून आले होते. यापैकी ९८ नगरसेविका पहिल्यांदाच निवडून आल्या होत्या. २०१७ च्या निवडणुकीत १२६ महिला निवडून आल्या आहेत़अनुभवी, आक्रमक टीम २०१२ मध्ये आरक्षणामुळे काही दिग्गज नगरसेविकांना अन्य प्रभागांतून निवडणूक लढवावी लागली. त्यात त्यांचा पराभव झाला. मात्र या अनुभवी व आक्रमक महिला पुन्हा मैदानात उतरल्या़ शिवसेनेतून अशा माजी नगरसेविकांना पुन्हा संधी दिली़ राजुल पटेल, शुभदा गुडेकर, माजी महापौर विशाखा राऊत या पुन्हा निवडून आल्या आहेत़ खुल्या प्रभागात विजयी महिलाशिवसेनेने राष्ट्रवादीतून आलेल्या नगरसेविका रिद्धी खुरसुंगे, भाजपातून ज्योती अळवणी, उपमहापौर अलका केरकर, राजश्री शिरवाडकर खुल्या प्रवर्गातून विजयी झाल्या आहेत़ च्देशातील सर्वाधिक हाय प्रोफाइल आणि उच्चभ्रू मलबार हिलमधील महानगरपालिका निवडणुकांत भाजपाच्या पाच महिला उमेदवारांपैकी चौघी विजयी झाल्या. पाचव्या जागेवरील भाजपा महिला उमेदवार फक्त दोन टक्के मतांनी हरल्या. भाजपाने जिंकलेल्या या चार प्रभागांमधील प्रभाग संख्या २१४ मधून सरिता पाटील आणि २१९ मधून ज्योत्स्नाबेन मेहता सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.च्ताडदेव-महालक्ष्मी भागातील प्रभाग २१४ मधून सरिता पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवारावर ५३०० मतांनी विजय मिळवला. खेतवाडी, गामदेवी भागातील प्रभाग २१७ मधून मीनल पटेल ७३४१ आणि शिवसेनेचा गड असलेल्या गिरगावच्या प्रभाग २१८ मध्ये डॉ. अनुराधा पोतदार ५३९५ मते मिळवून विजयी झाल्या. च्तर वाळकेश्वरच्या प्रभाग २१९ मध्ये ज्योत्स्ना मेहता यांनी ९९४२ मते मिळवून सलग दुसरा विजय मिळवला. भाजपाच्या या सर्व विजयी उमेदवारांसाठी आमदार मंगलप्रभात लोढा सक्रिय होते. प्रभाग २१४ ची जागा पुरुषवर्गासाठी खुली असूनही तेथे भाजपाच्या महिला उमेदवाराने विजय मिळवला.
मुंबईत पुन्हा ‘वूमन पॉवर’
By admin | Published: February 25, 2017 3:58 AM