मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्यात
By admin | Published: July 2, 2017 04:30 AM2017-07-02T04:30:01+5:302017-07-02T04:30:01+5:30
पहाटे पडलेल्या मुसळधार पावसाने महामार्गावर ससूनवघर-मालजीपाडा परिसरात पाणी साचून राहिल्याने, मुंबई-अहमदाबाद हायवेवरील
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : पहाटे पडलेल्या मुसळधार पावसाने महामार्गावर ससूनवघर-मालजीपाडा परिसरात पाणी साचून राहिल्याने, मुंबई-अहमदाबाद हायवेवरील वाहतूक दुपारपर्यंत विस्कळीत झाली होती.
मालजीपाडा-ससूनवघर परिसरातील जमिनीवर भराव घातल्याने पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. त्यामुळे मुसळधारर पावसात हायवेवर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी होत असून वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत.