Join us  

एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या

By मनोज गडनीस | Published: June 19, 2024 7:31 PM

देशांतर्गत मार्गांवरील विमान प्रवासात प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची अनुभुती मिळणार आहे

मुंबई - एअर इंडियाच्या ताफ्यातील विमानांचा पुढील वर्षापर्यंत कायाकल्प करण्यात येणार असून यापुढे कंपनीच्या विमानात इकोनॉमी, प्रीमीयम इकोनॉमी आणि बिझनेस क्साल अशा तीन श्रेणींत आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. देशांतर्गत मार्गांवरील विमान प्रवासात प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची अनुभुती मिळणार आहे. अलीकडेच एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात दाखल झालेल्या दोन ए-३२० जातीच्या विमानांमध्ये अशा त्रिस्तरीय पद्धतीची आसन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये, बिझनेस क्सालच्या ८ जागा आहेत तर प्रीमीयम इकोनॉमी श्रेणीच्या २४ तर इकोनॉमी श्रेणीच्या १३२ जागा निर्माण करण्यात आल्या आहेत. ए-३५० आणि बोईंग-७७७ या आलीशान विमानांतील प्रवाशांना ज्या पद्धतीची सुविधा मिळते त्याच पद्धतीची सुविधा ए-३२० सारख्या तुलनेने लहान विमानांत देखील उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे. ही विमाने देशांतर्गत व नजिक अंतरावरील परदेशी प्रवासासाठी वापरण्यात येणार आहेत.

टॅग्स :मुंबईएअर इंडिया