मुंबई : जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईविमानतळाने आपलाच विक्रम मोडीत काढला असून शनिवारी 24 तासांत तब्बल 1007 विमानांचे उड्डाण केले आहे. मागील विक्रम 1003 विमानोड्डाणांचा होता.
लंडनमधील एकच धावपट्टी असलेला गॅटविक विमानतळ दिवसाला 800 विमानोड्डाणे करतो. हा विमानतळ केवळ 10 तासच सुरु असतो. तर मुंबई विमानतळ 24 तास कार्यरत आहे. यापूर्वी 3 फेब्रुवारी 2018 मध्ये मुंबई विमानतळावर 980 विमानांनी उड्डाण केले होते. तर 24 नोव्हेंबर, 2017 मध्ये 935 विमानांनी उड्डाण केले होते.
महत्वाचे म्हणजे, मुंबई विमानतळाच्या दोन धावपट्ट्या आहेत. मात्र, त्या एकमेकांना छेदत असल्याने एकावेळी एकच विमान उड्डाण किंवा उतरू शकते. आजुबाजुला दाट वस्ती असल्याने आणि व्यस्त असल्याने नवीन धावपट्टी उभारणे अशक्य आहे. 1003 विमानउड्डानांचा विक्रम 5 जून, 2018 मध्ये करण्यात आला होता.