मुंबई विमानतळ तब्बल ९ तास बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:06 AM2021-05-18T04:06:37+5:302021-05-18T04:06:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चक्रीवादळाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सोमवारी विमानतळ ९ तास ...

Mumbai airport closed for 9 hours | मुंबई विमानतळ तब्बल ९ तास बंद

मुंबई विमानतळ तब्बल ९ तास बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे सोमवारी विमानतळ ९ तास बंद ठेवण्यात आले. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेची सूचना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि कार्गो विमानसेवा सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली सात विमाने अन्यत्र वळविण्यात आली.

चेन्नईहून निघालेले स्पाइस जेटचे विमान सकाळी ८.१५ वाजता मुंबई विमानतळावर उतरणे अपेक्षित होते; परंतु हवामानातील बदलांमुळे हे विमान सुरतच्या दिशेने वळविण्यात आले. लखनौवरून मुंबईला येणारे इंडिगोचे विमान अर्ध्या वाटेतून परत पाठविण्यात आले, तर सतर्कतेचा इशारा मिळताच इंडिगोचे आणखी एक विमान हैदराबाद विमानतळावर वळविण्यात आले. शिवाय अन्य चार विमाने इतरत्र वळविण्यात आली. हवामान विभागाकडून अलर्ट मिळाल्यानंतर मुंबई विमानतळावरून एकाही विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली नाही. त्याचप्रमाणे अन्य विमानतळांवरून मुंबईच्या दिशेने येणारी विमाने रद्द करण्यात आली.

* प्रवासीसंख्या कमी झाल्याने मोठा फटका नाही

कोरोनामुळे मुंबई विमानतळावरून दिवसाला केवळ २०० च्या आसपास विमान उड्डाणे होत आहेत. कोरोनापूर्वी येथून प्रतिदिन ९७० विमाने ये-जा करायची. येथील दैनंदिन प्रवासी संख्याही १७ हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा तितका मोठा फटका बसला नसल्याचे सांगण्यात आले; परंतु ऐनवेळी विमाने रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. चक्रीवादळाची पूर्वसूचना ८ दिवसांपूर्वी मिळाली होती. किनारपट्टी जवळ असल्याने मुंबई विमानतळाला त्याचा फटका बसणे साहजिक होते. अशावेळी विमानतळ बंद करण्याचा निर्णय दोन-तीन दिवस आधीच जाहीर करणे गरजेचे होते, अशी नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली.

......

किती विमाने रद्द झाली?

विमानतळ बंद करण्याची घोषणा केल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत मुंबईत येणारी ३४, तर मुंबईहून उड्डाण घेणारी २२ विमाने रद्द करण्यात आली. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधावा आणि मगच घरातून बाहेर पडावे, अशी सूचना केल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Mumbai airport closed for 9 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.