मुंबई विमानतळ दुरुस्ती : आजपासून ३० मार्चदरम्यान काही काळ विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:21 AM2019-02-07T06:21:51+5:302019-02-07T06:22:08+5:30

देखभाल-दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान मंगळवार, गुरुवार व शनिवारी असे तीन दिवस ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील.

Mumbai Airport Correction: There will be no airport runways for some time from today till 30 March | मुंबई विमानतळ दुरुस्ती : आजपासून ३० मार्चदरम्यान काही काळ विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद

मुंबई विमानतळ दुरुस्ती : आजपासून ३० मार्चदरम्यान काही काळ विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद

Next

मुंबई : देखभाल-दुरुस्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या ७ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान मंगळवार, गुरुवार व शनिवारी असे तीन दिवस ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येतील.
देखभाल-दुरुस्तीच्या कालावधीत अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात येतील. तसेच, अनेक विमानांचा मार्ग बदलण्यात येईल. सध्या विमानतळावरून दररोज २४ तासांत सरासरी ९५० विमानांची वाहतूक होते. त्यामुळे या दुरुस्तीचा फटका रोज सुमारे २३० ते २४० विमानांना पर्यायाने प्रवाशांना बसेल. कारण, ही विमाने रद्द केली जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत काही आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमानांच्या मार्गात तसेच वेळेत बदल करण्यात येईल.
देखभाल-दुरुस्तीच्या कालावधीत रद्द केल्या जाणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना परतावा देण्यात येईल. ज्यांना शक्य असेल त्यांना दुसºया विमानातून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे विचाराधीन आहे.

दुरुस्ती कधी?

७ फेब्रुवारी ते ३० मार्चदरम्यान : दर आठवड्यात मंगळवार, गुरुवार व शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्यांवर सहा तास सुरू राहणार देखभाल-दुरुस्तीचे काम.

होळीचा अपवाद
२१ मार्च रोजी गुरुवार असला तरी होळी असल्याने विमानतळावरील धावपट्टी सुरू ठेवण्यात येईल.

Web Title: Mumbai Airport Correction: There will be no airport runways for some time from today till 30 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.