Join us

मुंबई विमानतळाचा विक्रम! एका वर्षात प्रवासी वाहतुकीत तब्बल १०२ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 4:37 PM

मुंबई विमानतळानं २०२२-२३ या वर्षात प्रवासी वाहतुकीत अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. जी देशातील सर्वाधिक वाढ ठरली आहे.

मुंबई

मुंबई विमानतळानं २०२२-२३ या वर्षात प्रवासी वाहतुकीत अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. जी देशातील सर्वाधिक वाढ ठरली आहे. सर्वाधिक वेगानं वाढणारं हवाई केंद्र म्हणून मुंबई विमानतळ उदयास आलं आहे. विमानतळ प्राधिकरणानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, शहराच्या एअर टर्मिनलवर प्रवाशांच्या संख्येत १०२ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई विमानतळानं इतर विमानतळांना खूप मागे टाकलं आहे.

मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विमानतळावर गेल्या काही वर्षांपासून प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे, परंतु ताज्या आकडेवारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

प्रवासी वाहतुकीतील या वाढीमुळे विमान वाहतूक उद्योग आणि देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची अपेक्षा आहे. मुंबई विमानतळ सर्वात वेगाने वाढणारं हवाई केंद्र म्हणून उदयास येत असल्यानं, ते अधिक गुंतवणूक आकर्षित करेल आणि विमान वाहतूक क्षेत्रात अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचीही शक्यता आहे.  

मुंबई विमानतळाने देशातील इतर विमानतळांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने प्रवासी, विमान कंपन्या आणि भागधारकांचेही आभार व्यक्त केले आहेत.

टॅग्स :मुंबई