मुंबई विमानतळावरील धावपट्टी 6 तास बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:15 AM2018-10-23T08:15:00+5:302018-10-23T08:22:04+5:30
मुंबई विमानतळावरील धावपट्टी मंगळवारी (23 ऑक्टोबर) 6 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद राहणार आहे.
मुंबई : मुंबईविमानतळावरील धावपट्टी मंगळवारी (23 ऑक्टोबर) 6 तासांसाठी बंद राहणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद राहणार आहे. मुख्य आणि दुय्यम धावपट्टी दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी धावपट्टी सहा तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई विमानतळावरील धावपट्टी 6 तासांसाठी बंद राहणार, सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये धावपट्टीच्या देखरेखीसाठी बंद राहणार #MumbaiAirportRunway
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) October 23, 2018
सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत मुंबई विमानतळावरून एकही उड्डाण होणार नाही किंवा एकही विमान विमानतळावर उतरणार नाही. एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना धावपट्टी बंद राहण्याच्या कालावधीत अधिक तपशीलासाठी एअर इंडियाची वेबसाईट, अॅप किंवा कॉल सेंटरला भेट देण्याचे आवाहन केले आहे.