मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद, लँडिंग करताना घसरलं स्पाईस जेटचे विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 09:14 AM2017-09-20T09:14:05+5:302017-09-20T17:17:43+5:30
मुंबईत मंगळवारी दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे.
मुंबई, दि. 20 - मुंबईत मंगळवारी (19 सप्टेंबर) दुपारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद आहे. रनवे 14, रनवे 32वरुन विमानाचे उड्डाण आणि लँडीग सुरु आहे. पण सोसाटयाच्या वा-यामुळे हवाई वाहतुकीचा वेग मंदावला आहे. काल संध्याकाळपासून एकूण 51 विमाने दुस-या विमानतळांकडे वळवण्यात आली.
पावसाचा जोर आणि धावपट्टीवर पाणी असल्यामुळे काल स्पाईस जेटचे बोईंग 737 लँडीग करताना धावपट्टीवरुन घसरले. सुदैवाने यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काल दृश्यमानात कमी झाल्यामुळे 6.50 ते 7.16 दरम्यान मुंबई विमानतळावर हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती.
#Visual SpiceJet flight overshot runway 27 on landing at Mumbai airport & skidded off into the unpaved surface due to wet runway. pic.twitter.com/7tmWtoiGBy
— ANI (@ANI) September 19, 2017
रात्री दहाच्या सुमारास स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवरुन घसरल्यानंतर रनवे 14 वरुन रात्री 12.30 च्या सुमारास पहिल्या विमानाने उड्डाण केले. मुंबईत येणारे तसेच मुंबईतून बाहेर जाणारे प्रवासी विमान सेवेच्या स्थितीबद्दल विमानतळावरील कर्मचा-यांकडे चौकशी करत आहेत. खराब हवामानाचा मुंबई-दिल्ली विमानसेवेला मोठा फटका बसला आहे. मुंबई-दिल्ली मार्गावरील 13 विमानांना विलंब झाला असून, 15 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
#MumbaiRains At least 13 Mumbai-Delhi flights delayed and 15 cancelled.
— ANI (@ANI) September 20, 2017
Earlier #Visuals from Mumbai Airport: Chhatrapati Shivaji International Airport shut, both runways non-operational due to #MumbaiRainspic.twitter.com/9bxYnHVeb7
— ANI (@ANI) September 20, 2017