कोरोनाकाळात रुग्ण सुविधेला मुंबई विमानतळाचे सर्वोच्च प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:09 AM2021-09-06T04:09:53+5:302021-09-06T04:09:53+5:30

मुंबई : कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रावर प्रचंड ताण असताना मुंबई विमानतळाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखत रुग्णसुविधेला सर्वोच्च प्राधान्य दिले. मार्च ...

Mumbai Airport's top priority for coronary patient facilities | कोरोनाकाळात रुग्ण सुविधेला मुंबई विमानतळाचे सर्वोच्च प्राधान्य

कोरोनाकाळात रुग्ण सुविधेला मुंबई विमानतळाचे सर्वोच्च प्राधान्य

Next

मुंबई : कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रावर प्रचंड ताण असताना मुंबई विमानतळाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखत रुग्णसुविधेला सर्वोच्च प्राधान्य दिले. मार्च २०२० ते आतापर्यंत येथून जवळपास १८५ हवाई रुग्णवाहिकांनी ये-जा केली. त्यापैकी ८४ रुग्णवाहिकांनी दुसऱ्या लाटेदरम्यान सेवा दिली.

पहिल्या लाटेच्या काळात हवाई प्रवासावर बंदी असली तरी अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय साहित्याची ने-आण करणाऱ्या विमानांचे प्रचलन सुरू होते. कोरोनाचा प्रकोप वाढत गेला, तसतसा मुंबई विमानतळावर रुग्णवाहिकांचा ताण वाढला. हवाई रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागणाऱ्या रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असते. त्यामुळे अशा रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी हवाई रुग्णवाहिकांच्या आगमन आणि प्रस्थानासाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली. त्यानुसार रुग्णवाहिका मार्गस्थ होणार असल्याची सूचना मिळाल्यानंतर संबंधितांना त्याबाबत कळवून विनाअडथळा आणि जलद विमान प्रचलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुंबई विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

मुंबई विमानतळावर हवाई रुग्णवाहिका आणि विशेष विमानांच्या वाढलेल्या प्रचलनामुळे समर्पित जनरल एव्हिएशन (जीए) टर्मिनल तयार करण्यात आले. कोरोना उद्रेकापासून आतापर्यंत १८५ हून अधिक रुग्णवाहिकांची उड्डाणे येथून सुरळीत पार पडली. त्या माध्यमातून ६५४ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सेवा देण्यात आली. केवळ दुसऱ्या लाटेत जीए टर्मिनलने ८४ एअर ॲम्ब्युलन्स हाताळल्या. त्यातील ९ आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून आल्या होत्या.

................

...अशी उभारली व्यवस्था

- विमानतळावर दाखल झाल्यानंतर रुग्णाचा रुग्णालयात दाखल होण्याचा मार्ग सुलभ करून देणे, तसेच रुग्णालय आणि रुग्णाच्या नातेवाईकांत समन्वय साधण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले.

- त्यामुळे २५ मिनिटांच्या आत रुग्णाला उपचारांकरिता दाखल करणे शक्य झाले. शिवाय वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वहनासाठीही विशेष व्यवस्था उभारण्यात आली.

Web Title: Mumbai Airport's top priority for coronary patient facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.