मोठी बातमी! आक्सा बीचवर १२ जणांना वाचवण्यात यश, 'लाईफ गार्ड' ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 10:19 PM2022-05-26T22:19:11+5:302022-05-26T22:19:58+5:30
मालाड पश्चिम येथील डेंजरस बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आक्सा बीचवर आज दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी काही मुले सुमद्राला असलेली भरती आणि करंटमुळे गटांगळ्या खात बुडायला लागली.
मनोहर कुंभेजकर
मुंबई :
मालाड पश्चिम येथील डेंजरस बीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आक्सा बीचवर आज दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी काही मुले सुमद्राला असलेली भरती आणि करंटमुळे गटांगळ्या खात बुडायला लागली. यावेळी येथे तैनात असलेले येथील दृष्टी लाईफ कंपनीचे सहा लाईफ गार्ड देवदूतासारखे धावून आले आणि त्यांनी या १२ मुलांना वाचवले.
येथील लाईफ गार्डचे प्रमुख नथुराम सुर्यवंशी व भरत मानकर यांच्यासह उर्वरित चार जयेश कोळी प्रसाद बाजी, मयूर कोळी, आवेश पाटील या एकूण ६ दृष्टी लाईफ कंपनीच्या लाईफ गार्डच्या ही घटना नजरेस पडली. ते देवदूत म्हणून धावून आले आणि त्यांनी जीवाची बाजी मारत त्यांनी समुद्रात उडी घेतली. आणि त्यांनी १२ जणांना बुडतांना त्यांच्यावर झडप मारत बाहेर काढले. त्यापैकी तीन मुले पळून गेली. या वाचलेल्या मुलांना आम्ही त्यांचे वडील मोहसीन अब्दुल सत्तार शाह यांच्याकडे सुपूर्द केले अशी माहिती येथील अनुभवी लाईफ गार्ड नथुराम सूर्यवंशी यांनी लोकमतला दिली. लाईफ गार्डच्या या बहादूरी कामगिरीचे कौतूक होत आहे.
१२ जून २००० साली १२ मुले बुडाली होती
आक्सा बीचवर १२ जून २००० साली मालाड पूर्व येथील १२ मुले येथे फुटबॉल खेळायला गेली होती. खोल पाण्यात बॉल काढण्यासाठी ही मुले साखळी करून आत गेली असता येथील समुद्राला असलेल्या जोरदार करंटी त्यांना आपल्या कवेत घेतले आणि ही मुले बुडाली होती. त्यावेळी त्यांचा शोध तब्बल दोन तीन दिवसांनी लागला. तीन दिवस मालाडवर शोक काळा पसरली आणि त्यांच्या घरात चूल पेटली नाही. सदर प्रतिनिधी या घटनेचा साक्षीदार होते.