मुंबई : म्हाडाच्या निष्कसित जागेवर थाटले राजकीय पक्षाचे अवैध कार्यालय!
By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2023 03:34 PM2023-06-16T15:34:24+5:302023-06-16T15:35:21+5:30
कंपाउंडची संरक्षक भिंत तोडून त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाचे अवैद्य कार्यालय थाटण्यात आले आहे.
मुंबई-कांदिवली पूर्व लोखंडवाला काँम्प्लेक्स म्हाडा रोड नं. ३ या ठिकाणी म्हाडाच्या प्लँटवर अवैद्यरित्या असलेलं बांधकाम ते दि.२४ मार्च २०२३ रोजी म्हाडाने आपला भूखंड पोलिस संरक्षणाने मोकळा करून घेतला होता आणि पूर्ण भुखंडाला संरक्षण भिंत घालुन घेण्यात आली होती.
परंतु या कंपाऊंडची संरक्षक भिंत तोडून त्या ठिकाणी एका राजकीय पक्षाचे अवैद्य कार्यालय थाटण्यात आले आहे. आज सायंकाळी या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. अवैद्यरित्या असलेलं बांधकाम तोडणारे म्हाडा या अवैद्य कार्यालयावर कारवाई करणार का? संबंधित अधिकारी याची दखल घेणार का ?याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
दरम्यान म्हाडाचे कांदिवली विभागाचे उपअभियंता तेली यांच्याशी संपर्क केला असता, म्हाडाच्या जागेवर कसे काय अवैद्य कार्यालय थाटण्यात येते, यात तथ्य आढळल्यास म्हाडा सदर बांधकाम तोडून टाकेल, अशी प्रतिक्रिया दिली