Join us

Malad: घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्‍य, शेजाऱ्याला अटक; मालाड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:07 IST

मुंबईतील मालाड परिसरात शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विनयभंग करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी गेल्या अनेक हा प्रकार सुरू होता. अखेर पीडिताने धाडस करत तिच्यासोबत सुरू असलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने ताबडतोब मालवणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता (वय, १०) शालेय विद्यार्थिनी आहे. तर, आरोपी रिक्षाचालक आहे. पीडिता आणि आरोपी एकमेकांच्या शेजारी राहतात. दरम्यान, १ फेब्रुवारी २०१५ रोजी पीडिता घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपीने पहिल्यांदा तिचा विनयभंग केला. त्यानंतर ३१ मार्च २०२५ दरम्यान आरोपीने अनेकदा तिचा विनयभंग केला. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर दोन महिन्यानंतर पीडिताने धाडस दाखवून तिच्यासोबत सुरू असलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर पीडिताच्या आईने ताबडतोब मालवणी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दिली. 

पीडिताच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मालवणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.