Mumbai Auto-taxi fares hike: वाढत्या पेट्रोल, डिझेलचा परिणाम जाणवू लागला; मुंबईत रिक्षा, टॅक्सीचे भाडे वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 04:20 PM2021-02-22T16:20:20+5:302021-02-22T16:25:47+5:30
petrol diesel price hike : अनेक चालकांनी त्यांच्या वाढलेल्या भाड्यावर आनंद व्यक्त केला आहे. कारण कोरोनामुळे एप्रिल ते जूनमध्ये एकाही रुपयाचे उत्पन्न मिळाले नव्हते. अनेकजण उधारी आणि कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. भाडे वाढविल्याने काहीतरी आशा निर्माण झाली आहे. या भाडेवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर जरूर दिसणार आहे.
मुंबई : 100 कडे झेपावलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा (petrol diesel price hike) परिणाम आता बाजारावर जाणवू लागला आहे. ज्यांची वाहने नाहीत त्यांनाही आता भूर्दंड सोसावा लागणार आहे. पेट्रोल, डिझेल वाढेनात का, आमच्याकडे गाड्या कुठे आहेत म्हणणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण आता मुंबईतील रिक्षा, टॅक्सीने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे वाढत्या इंधनाचा फटका आता सामान्य लोकांनाही बसणार आहे. (Mumbai Auto-taxi fares hike by 3 rupees in Mumbai.)
ऑटो-टॅक्सीच्या कमीतकमी भाड्यामध्ये 3 रुपयांची वाढ झाली आहे. रिक्षाचे प्रारंभिक भाडे हे 18 रुपये होते. आता त्यामध्ये 3 रुपयांची वाढ झाल्याने ते 21 रुपये झाले आहे. तर काळ्यापिवळ्या टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये झाले आहे.
या भाडेवाढीचे स्वागत मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईच्या रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी केले आहे. गेल्य़ा पाच वर्षांपासून इंधनाचे दर वाढत होते. त्याशिवाय वाहनाचा मेन्टेनन्स आणि विमादेखील वाढला होता. तरीही भाड्यामध्ये एक पैशाची वाढ झाली नव्हती. आता पेट्रोल, डिझेलसह सीएनजीदेखील महाग झाला आहे. यामुळे काहीतरी फायदा होऊन दिलासा मिळेल असे त्यांचे म्हणणे आहे.
Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...
अनेक चालकांनी त्यांच्या वाढलेल्या भाड्यावर आनंद व्यक्त केला आहे. कारण कोरोनामुळे एप्रिल ते जूनमध्ये एकाही रुपयाचे उत्पन्न मिळाले नव्हते. अनेकजण उधारी आणि कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. भाडे वाढविल्याने काहीतरी आशा निर्माण झाली आहे. या भाडेवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर जरूर दिसणार आहे.
एका चालकाने सांगितले की, 22 फेब्रुवारीला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Car care tips: भर उन्हातही तुमची कार ठेवा थंड; या टिप्स फॉलो करा...