मुंबई - शाकाहार- पूरक आस्थापनांची भरभराट होऊ शकेल. तसेच मानव व इतर प्राण्यांसाठी एक उत्तम विश्व निर्माण व्हावे, यासाठी पूरक वातावरण निर्मिती केल्याबद्दल पिटा इंडियाचा २०२१ या वर्षाचा सर्वाधिक शाकाहार- पूरक शहर पारितोषिकासाठी मुंबई शहराची निवड करण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
पिटा इंडियाच्या २०२१ या वर्षातील पुरस्कारासाठी मुंबई शहराची निवड केल्याबद्दल महापौरांनी आभार मानते. आपण विचाराने, आहाराने, विहाराने शाकाहारी असले पाहिजे. प्राण्यांना सुद्धा मुक्तविहार करण्याला जागा असावी या दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेने पेट गार्डन तयार केले असल्याचे महापौरांनी यावेळी आवर्जून सांगितले. मनुष्य, प्राणीधर्म पाळून मुक्या प्राण्यांवर प्रेम करुया, असेही त्यांनी सांगितले. कुठल्याही एका आहाराला समर्थन न देता नागरिकांनी मुंबईला शाकाहार पूरक शहर बनविण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार असल्याचेही त्या म्हणाल्या.