Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:27 AM2023-07-16T10:27:44+5:302023-07-16T10:29:04+5:30

मुंबईतील वांद्रे येथे ही धक्कादायक घटना घडली. व्हिडीओमध्ये बँडस्टँडवर एक जोडपं आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडतं ते भीतीदायक आहे.

mumbai bandra bandstand woman drown and dead by giant wave video viral | Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली

Video - मम्मी-मम्मी... लेक ओरडत राहिली; फोटोच्या नादात महिला डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली

googlenewsNext

आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते जीवघेणं ठरू शकतं असं म्हणतात. कधी व्हिडिओ तर कधी सेल्फीच्या नादात अनेक वेळा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच एक भयंकर व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथे ही धक्कादायक घटना घडली. व्हिडीओमध्ये बँडस्टँडवर एक जोडपं आपल्या कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडतं ते भीतीदायक आहे.

व्हिडीओमध्ये हे जोडपे एका दगडावर बसून समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे आणि त्यांची मुलगी हा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओमध्ये मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. समुद्राच्या लाटा वर येत आहेत आणि पती-पत्नी एकमेकांना धरून बसले आहेत. यानंतर एक जोरदार लाट येते आणि महिलेला घेऊन जाते. मुलगी आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडतो. व्हिडिओमध्ये 'मम्मी-मम्मी' असा मुलीचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत आहे. ज्योती सोनार असं महिलेचं नाव आहे.

महिलेचा पती मुकेश हा गौतम नगर, रबाळे येथे राहणारा असून एका खासगी कंपनीत टेक्निशियन म्हणून काम करतो. तो म्हणाला, "मी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. जेव्हा चौथी लाट आम्हाला मागून धडकली तेव्हा माझा तोल गेला आणि आम्ही दोघेही घसरलो. मी माझ्या बायकोची साडी पकडली तेव्हा एका माणसाने माझा पाय धरला, पण तिला वाचवू शकलो नाही."

तो पुढे म्हणाला, "माझी पकड मजबूत असली तरी ती साडीमुळे घसरली आणि माझ्या डोळ्यांदेखत समुद्रात ओढली गेली. माझी मुलं तिथे होती. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र त्याचा फायदा झाला नाही. या घटनेतून मुलं कशी सावरतील हे मला माहीत नाही. सायंकाळी 5.12 वाजण्याच्या सुमारास ही घटना पाहिल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुंबई अग्निशमन दलाच्या शोध मोहिमेनंतर रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mumbai bandra bandstand woman drown and dead by giant wave video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई