Join us

अखेर बारसे संपन्न! मुंबईतील पेंग्विनच्या पिल्लाचे नाव 'ऑस्कर'; बंगाल टायगरच्या बछड्याचे नाव 'वीरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:58 PM

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडला.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात (Veer Mata Jijabai Bhosale Udyan And Zoo) जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लाचा अन् वाघाच्या बछड्याचा नामकरण सोहळा आज सकाळी पार पडला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी ऑडिटोरियममध्ये आज केक कापून बारसे  साजरे केले.भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात १९ ऑगस्ट २०२१ रोजी जन्मलेल्या पेंग्विनच्या बाळाचे नाव ऑस्कर असे ठेवण्यात आले आहे.

छायाचित्र : दत्ता खेडेकर

तर तब्बल १५ वर्षानंतर राणीबागेत बंगाल टायगरची जोडी दोन वर्षांपूर्वी आणण्यात आली होती. औरंगाबाद येथून सिद्धार्थ प्राणीसंग्रालयातून आणलेल्या या जोडीला १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बछडा झाला आहे. त्या मादी बछड्याचे नाव वीरा असे ठेवण्यात आले आहे.

छायाचित्र : दत्ता खेडेकर

करिश्मा आणि शक्ती असे या वाघांच्या जोडीचे नाव आहे. सध्या वीरा लहान असल्याने राणीबागेत येणाऱ्या पर्यटकांना तिला पाहता येणार नसल्याचंही सांगण्यात आले आहे. 

पेंग्विन कक्षात ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या एका पेंग्विन पिल्लामुळे आता पेंग्विनची एकूण संख्या नऊ इतकी झाली आहे. यामध्ये पाच नर आणि चार मादी आहेत. या ठिकाणी पेंग्विन पाहायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. परंतु सध्या कोरोना विषाणूच्या पुन्हा वाढत असलेल्या प्रभावामुळे राणीची बाग पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :राणी बगीचावाघमुंबईकिशोरी पेडणेकर