Join us

गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईच्या कामावरून शिवसेना-भाजपात श्रेयाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 10:12 AM

भाजपाने केले प्रतिकात्मक भमिपूजन!

मनोहर कुंभेजकर

मुंबई - गोरेगावच्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईच्या कामावरुन शिवसेना- भाजपात श्रेयवादाची लढाई जुंपली आहे. गोरेगावची नवी सांस्कृतिक ओळख होणाऱ्या प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईचा भूमिपूजन सोहळा येत्या सोमवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समोर आली.  आता सोमवारी 30 जुलैला सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना व भाजपात पुन्हा या कामाच्या श्रेयवादावरुन जुंपणार असून जोरदार घोषणाबाजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोरेगावात 800 आसनी  सुसज,अत्याधुनिक प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व 210 गाळे विक्री असलेले टोपीवाला मंडई आणि 53 सदनिका असलेली सुसज्ज इमारत येथे भविष्यात साकारणार आहे. या कामासाठी पालिकेने 122 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

या नाट्यगृहाच्या सोमवारी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याआधीच शनिवारी 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता भाजपाने राज्याच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले होते. पालिका प्रशासनाने कार्यक्रम पत्रिकेत धूर्तपणे उपनगर पालक मंत्री व राज्याचे शिक्षण मंत्री विनोंद तावडे व मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अॅड. आशिष शेलार यांचे नावच वगळल्याच्या निषेधार्थ व आणि गोरेगावकरांच्या आग्रहास्तव भाजपाने येथे प्रतिकत्मक भूमिपूजन केल्याची माहिती पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 58 चे भाजपा नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

यापूर्वी 22 डिसेंबर 2016 रोजी राम मंदिर रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा व 29 मार्च 2018 रोजी सीएसटी ते गोरेगाव पर्यत हार्बर रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीकरणं उदघाटन सोहळा यावेळी सेना व भाजपात या कामांच्या श्रेयवादावरून जोरदार घोषणा व पोस्टारबाजी झाली होती.गोरेगाव हार्बर रेल्वे लोकार्पण सोहळ्याला शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांचे नावच कार्यक्रम पत्रिकेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने टाकले नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने कार्यक्रमच्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता.

या नाट्यगृहासाठी राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गेले 25 वर्षे सातत्याने प्रयत्न केले होते. यापूर्वीच्या चार तत्कालीन पालिका आयुक्तांबरोबर त्यांनी सातय्याने पाठपुरावा केला होता. तर उद्योगमंत्री या नात्याने मंत्रालयात पालिका आयुक्त अजोय मेहता व संबंधित अधिकाऱ्यां बरोबर अनेक वेळा बैठका देखिल घेतल्या होत्या. त्यामुळे या नाट्यगृह व मंडईसाठी उद्योगमंत्र्यांनी केलेले अथक प्रयत्न तमाम गोरेगावकरांना चांगलेच माहिती आहेत असा ठाम दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी लोकमतशी बोलताना केला. कामे शिवसेनेने करायची व दीड वर्षे पालिकेत नगरसेवक असल्यामुळे श्रेय भाजपाने घ्यायचे हा जणू त्यांचा नित्यक्रमच झाला असल्याचा टोला दिलीप शिंदे यांनी लगावला.

तर कामाचे खरे श्रेय हे महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व येथून निवडून आलेल्या स्थानिय आमदार विद्या ठाकूर व  भाजपाचे आहे असा ठाम दावा माजी उपमहापौर दिलीप पटेल यांनी केला आहे. भाजपाच्या या नाट्यगृहाच्या शनिवारी सकाळी झालेल्या या प्रतिकत्मक भूमीपूजनानंतर येथे उपस्थित भाजपा नगरसेवक,पदाधिकारी व गोरेगावकरांना मार्गदर्शन करतांना दिलीप पटेल म्हणाले की,1997 साली आपण येथून प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या नाट्यगृहाचा प्रस्ताव सादर केला होता आणि त्यानंतर सातत्याने प्रयत्न केले होते.येथील नाट्यगृह व मंडईसाठी गेली अनेक वर्षे गोरेगावचे नगरसेवक व माजी बाजार समिती अध्यक्ष राहिलेले दिवंगत आर.आर.पिल्ले यांनी व येथील काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले समीर देसाई यांनी सुद्धा पयत्न केले होते हे नाकारता येणार नाही.प्रभाग समिती अध्यक्ष संदीप पटेल यांनी सांगितले की,पी दक्षिण विभागातून 2014 साली झालेल्या पालिका निवडणुकीत येथून भाजपाचे 5 नगरसेवक निवडून आल्यावर आम्ही सुद्धा या कामाचा पालिका आयुक्त व प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.त्यामुळे भाजपाचे याकामाचे भाजपाने गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :शिवसेनाभाजपाआदित्य ठाकरे