४१व्यांदा मुंबईने रणजी चषकावर नाव कोरले
By admin | Published: February 26, 2016 04:11 PM2016-02-26T16:11:23+5:302016-02-26T18:03:13+5:30
मुंबईने एक डाव आणि २१ धावांनी सौराष्ट्राचा पराभव करत ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरण्याचा पराक्राम केला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि २६ - मुंबईने एक डाव आणि २१ धावांनी सौराष्ट्राचा पराभव करत ४१व्यांदा रणजी चषकावर नाव कोरण्याचा पराक्राम केला आहे. सौराष्ट्राच्या पहिल्याडावातील २३५ धावांचा पाठलाग करताना मुंबईने सलामीची जोडी झटपट बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने (११७) केलेली शतकी खेळी व सूर्यकुमार यादवच्या (४८) उपयुक्त फलंदाजीने मुंबईने पहिल्या डावांत ३७१ धावांचा डांगर उभा करत पहिल्या डावात १३६ धावांची आघाडी घेतली होती. आज तिसऱ्या दिवशी ठाकूरच्या ५ बंळीच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात सौराष्ट्राला ११५ धावात गुंडाळले आणि एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवत रणजी चषकावर ४१व्यांदा नाव कोरत इतिहास बनवला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बुधवारपासून रणजी चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यास सुरुवात झाली होती. मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती.
मुंबईच्या विजयाचे शिल्पकार धवल कुलकर्णी (७ बळी), शार्दूल ठाकूर (८ बळी) आणि श्रीकांत अय्यर(११७ धावा) ठरले. पहिल्या डावात धवल कुलकर्णीने ५ आणि दुसऱ्या डावात २ फलंदाजाला बाद केले तर शार्दूल ठाकूरने पहिल्या डावात ३ फलंदाज आणि दुसऱ्या डावात ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सौराष्ट्राच्या २३५ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरवात थोडी अडखळतच झाली २२ धावातं २ फलंदाज गमावले होते. त्यानंतर सुर्यकुमार यादव (४४) आणि श्रीकांत अय्यर (११७) मुंबईला आघाडी मिळवून दिली.
तर पहल्या डावात सौराष्ट्राकडून अर्पित वासवदाने पाऊणशतकी व प्रेरक मंकडने ६६ अर्धशतकी खेळी करून संघाचा कोसळणारा डाव सावरला होता. पण दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजी समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. ठराविक अंतरात सौराष्ट्राचे फलंदाज बाद झाले. मुंबईकडून दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने ५, धवल कुलकर्णी २, नायर १ आणि संधूने २ फलंदाजाला बाद केले.