BEST Strike Live : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अद्याप तोडगा नाही

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:17 AM2019-01-08T08:17:22+5:302019-01-08T15:47:53+5:30

मुंबई  :  बेस्ट  कामगारांचा संप टळण्यासाठी गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली. संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ...

BEST Strike Live : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अद्याप तोडगा नाही | BEST Strike Live : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अद्याप तोडगा नाही

BEST Strike Live : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अद्याप तोडगा नाही

Next

मुंबई : बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी गेले काही दिवस सुरू असलेली चर्चा अखेर निष्फळ ठरली. संप मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक न्यायालयातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच आव्हान दिले. यामुळे संतप्त कामगार सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे हाल होत आहेत. 

काय आहेत मागण्या?

सुधारित वेतन करार

दिवाळीचा बाेनस

कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न साेडविणे

बेस्टचे महापालिकेत विलीनीकरण

(बेस्ट कामगारांचा संप सुरू; मुंबईकरांचे होतायेत हाल)

कारवाई होणार
संपाचा फटका मुंबईतील जवळपास २५ लाख प्रवाशांना बसत असल्यानं संपात सहभागी होणाऱ्या कर्मचा-यांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्र्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवर्षी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स  युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.

(Bharat Bandh: देशव्यापी संपात आरबीआयसह जीपीओ, बीएसएनएल कर्मचारी)

शिवसेनेचा नैतिक पाठिंबा

सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी होऊ शकत नाही. मात्र, कामगारांचा कौल संपाच्या बाजूने असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. त्यामुळे या संपाला शिवसेना नेत्यांनी नैतिक पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या वर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. त्यामुळे पुन्हा संप होऊ नये, यासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, बेस्ट प्रवाशांचे हाल होऊ नयेत, यासाठी जादा गाड्या सोडण्यासाठी एस.टी. महामंडळाला पत्र पाठविले असल्याचे बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, ९५ टक्के कामगार संपाच्या बाजूने असल्यामुळे बससेवेवर परिणाम होणार आहे.

LIVE

Get Latest Updates

02:30 PM

वेतन निश्चिती केल्याशिवाय बेस्टचा संप मागे घेणार नाही - शशांक राव

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बेस्ट अर्थसंकल्प विलीनीकरण करण्याच्या मुद्यावर बेस्ट कृती समिती ठाम आहे.  संप मागे घेण्यासाठी होणारी तडजोडीचा प्रस्ताव आयुक्तांना दिला आहे. यानंतर होणाऱ्या बैठकीला काहीही अर्थ नसल्याने वेतन निश्चिती केल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची प्रतिक्रिया बेस्ट कामगारांचे नेते शशांक राव यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

01:47 PM

01:37 PM

मुंबई : मागण्या मान्य होईपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप सुरू राहणार, बेस्ट कृती समितीचा बैठकीत इशारा.

12:50 PM

बेस्ट संपाबाबत तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला सुरुवात, बेस्ट कृती समितीची बेस्ट प्रशासनासोबत बैठक, शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेना मात्र दाराबाहेरच,
मुंबई महापालिका मुख्यालयात बैठक सुरू

11:52 AM

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांना संदेश

11:25 AM

वांद्रे बस डेपो

11:02 AM

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीकडून 40 बसेस सोडण्यात आल्या आहेत



 

11:02 AM

सीएसएमटी परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट



 

10:05 AM

आता कामगारांच्या एकजुटीचा दणका प्रशासनाला दिसू दे - नितेश राणे



 

09:57 AM

मुंबईकरांच्या मदतीला धावली एसटी   
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून जवळपास 40 एसटी बसेस सोडल्या आहेत. शिवाय, गरजेनुसार आणखी जादा एसटी बसेस सोडण्यात येतील, असेही सांगण्यात आले आहे.
कुर्ला पश्चिम ते बांद्रा - 05 एसटी
कुर्ला पूर्व ते चेंबूर - 05 एसटी
दादर ते मंत्रालय - 05 एसटी
पनवेल ते मंत्रालय  - 05 एसटी 
सीएसएमटी ते मंत्रालय - 05 एसटी
ठाणे ते  मंत्रालय - 15 एसटी
 

09:31 AM

बेस्ट युनियनची सकाळी 11 वाजता प्रशासनासोबत बैठक 
 

09:31 AM

बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक, मुंबई महानगरपालिका मुख्यालयात तोडग्यासाठी चर्चा

08:49 AM

कुर्ला : मुंबईकर खासगी वाहनांच्या मदतीनं ऑफिस गाठत आहेत

08:20 AM

सर्वसामान्य वेठीस


08:20 AM

एकाही बस आगारातून बस सोडण्यात आलेली नाही 
 

08:20 AM

सकाळच्या शिफ्टमधील वाहन चालक-वाहक गैरहजर
 

08:20 AM

सोमवारी (7 जानेवारी) मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू
 

Web Title: BEST Strike Live : मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार, अद्याप तोडगा नाही

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.