मुंबईकरांनो...बेस्ट बसमध्ये गर्दी आहे, आपला मोबाइल सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:37 IST2025-01-21T15:36:24+5:302025-01-21T15:37:16+5:30

बेस्ट बसमध्ये चढताना किंवा प्रवास करताना मोबाइल चोरी होण्याचे प्रकार वाढत आहेत.

mumbai best bus is crowded take care of your mobile | मुंबईकरांनो...बेस्ट बसमध्ये गर्दी आहे, आपला मोबाइल सांभाळा!

मुंबईकरांनो...बेस्ट बसमध्ये गर्दी आहे, आपला मोबाइल सांभाळा!

मुंबई

बेस्ट बसमध्ये चढताना किंवा प्रवास करताना मोबाइल चोरी होण्याचे प्रकार वाढत आहेत. बस थांब्यावर आणि गाडीत असलेली गर्दी तसेच इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी घाईगडबडीचा गैरफायदा भुरटे चोरांकडून घेतला जात आहे. त्यामुळे प्रवासात आपल्या खिशातील, हातातील मोबाइलची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सध्या महागडे मोबाइल फोन वापरण्याचा लोकांमध्ये कल आहे. त्यातही महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण त्याकडे जास्त आकर्षिक होताना दिसतात. हे सर्वच मोबाइल चोरांचे लक्ष्य होत असल्याचे दिसून येत आहे. 

चोरीची काही प्रकरणे
खिशातून मोबाइल चोरी

कांदिवली पश्चिमच्या बोईसर बस डेपोमध्ये २५ नोव्हेंबर रोजी बस क्रमांक २१० मध्ये चढताना अनोळखी व्यक्तीने शर्टाच्या खिशातून मोबाइल चोरला. या मोबाइलची किंमत जवळपास १८ हजार रुपये असून याविरोधात निवृत्त पालिका कर्मचारी रवींद्र विचारने यांनी तक्रार दिली आहे. 

प्रवासात मोबाइलची चोरी
अंधेरी पूर्व येथे ४१५ क्रमांकाच्या बसमध्ये १३ जानेवारीला अभिषेक हाडवळे (२५) आणि गोलू यादव (२१) यांचा मोबाइल चोरी करण्यात आला. याची किंमत ६० हजार रुपये होती. 

...आणि केली मोबाइलची विक्री
मोबाइलमधील आय क्लाउड अकाऊंट डिलीट करणे शक्य नसल्याने चोरट्यांकडून एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर कुरन मोबाइलमधील डेटा व संबंधित अकाऊंट डिलीट केले जाते. अशा प्रकारे डेटा डिलीट करुन मोबाइलची विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. 

चोरी झाल्यास काय करावे?
तुमचा मोबाइल चोरी झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची तक्रार करा आणि त्यांना मोबाइलच्या आयएमइआय नंबरसह आवश्यक तपशील पुरवा. 

चोरीला गेलेल्या मोबाइल वापरण्यापासून रोखण्यासाठी तुमचा आयएमइआय नंबर तुमच्या सेवा प्रदात्याकडे देत तो ब्लॉक करा. 

गुन्ह्यांची उकल कमीच
मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीत चोरीच्या ७ हजार ८०८ घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मोबाइल चोरीच्या घटनांचाही समावेश आहे. त्यापैकी २ हजार ५३३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. 

Web Title: mumbai best bus is crowded take care of your mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.