Join us

खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 4:12 PM

भांडुपमधील दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयात ठिय्या दिला आहे.

मुंबईतील भांडूपमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर दुसरीकडे कारवाईसाठी मनसे उमेदवार सहाय्यक पालिका आयुक्तांची वाट पाहत असून ते समोर यायला तयार नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

भांडुपमधील दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयात ठिय्या दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते गेले दीड ते दोन तासांपासून पालिका सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांची वाट पाहत आहेत. परंतू, सहाय्यक आयुक्त निवडणुकीच्या कामात एवढे व्यस्त आहेत की त्यांना या दुर्दैवी घटनेवर कारवाई करण्यासाठी वेळ नाहीय, असा आरोप मनसे नेत्यांनी केला आहे. 

गेले दीड ते दोन तासांपासून पालिका मनसेचे पदाधिकारी सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांची वाट पाहत आहेत. मात्र सहायक आयुक्त भेटण्यास देखील येत नाहीये, जो पर्यंत कारवाई होत नाही आम्ही इथेच आहोत. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि भांडुपचे उमेदवार शिरीष सावंत यांनी दिली आहे. 

टॅग्स :मनसेमुंबई महानगरपालिका