आगामी पालिका निवडणुकीसाठी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:01+5:302021-09-21T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार ...

Mumbai Bharatiya Janata Yuva Morcha for the upcoming municipal elections | आगामी पालिका निवडणुकीसाठी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाने कसली कंबर

आगामी पालिका निवडणुकीसाठी मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाने कसली कंबर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेवा आणि समर्पण मोहिमेअंतर्गत पाच दिवसीय युवा वॉरियर संकल्प यात्रा मंगळवारपासून सुरू होत आहे. मुंबई भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप महाराष्ट्र राज्य सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ललित कला भवन, जांबोरी मैदानाजवळ होणार आहे. ही युवा वॉरियर संकल्प यात्रा २१ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २५ सप्टेंबरला संपेल. ज्या अंतर्गत मुंबईतील तरुणांना पक्षाशी जोडण्याचे आणि त्यांच्यातील छुपे कलागुण विकसित करण्याचे काम केले जाईल, असे तेजिंदर सिंह तिवाना यांनी सांगितले.

युवा वॉरियरच्या माध्यमातून जास्तीतजास्त तरुणांना जोडून आणि त्यांना राष्ट्र उभारणीच्या भूमिकेत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भात आमची पहिली जबाबदारी ही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा महापौर विराजमान कसा होईल ही असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

आमच्याकडे काहीतरी मोठे करण्याची जिद्द, ऊर्जा आणि इच्छाशक्ती आहे आणि आमच्याकडे देवेंद्र फडणवीस आणि मंगल प्रभात लोढा यांचे मार्गदर्शन आहे. ‘तरुण वॉरियर संकल्प यात्रे’च्या माध्यमातून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत इतिहास घडविण्याची वेळ आली असल्याची भूमिका त्यांनी विशद केली.

Web Title: Mumbai Bharatiya Janata Yuva Morcha for the upcoming municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.