CoronaVirus News: मुंबईत ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले; ख्रिसमस, न्यू इयरसाठी पालिकेकडून नियमावली जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 09:05 PM2021-12-18T21:05:33+5:302021-12-18T21:05:52+5:30

CoronaVirus News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा १०० च्या पुढे; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात

mumbai bmc announces new guidelines amid rising omicron cases in maharashtra | CoronaVirus News: मुंबईत ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले; ख्रिसमस, न्यू इयरसाठी पालिकेकडून नियमावली जारी

CoronaVirus News: मुंबईत ओमायक्रॉनचे ८ नवे रुग्ण आढळले; ख्रिसमस, न्यू इयरसाठी पालिकेकडून नियमावली जारी

Next

मुंबई: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आज ८ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४ रुग्ण मुंबईचे, ३ साताऱ्याचे आणि १ पुण्याचा आहे. यामुळे राज्यातील बाधितांचा आकडा वाढला आहे. 

ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. लोकांनी गर्दी टाळावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे.

पालिकेची नियमावली-
१. बंद हॉलमधील कोणत्याही कार्यक्रमात हॉलच्या ५० टक्के क्षमतेहून अधिक लोकांना परवानगी नसेल. तर खुल्या जागेवर कार्यक्रम घेताना क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी असेल.

२. एखाद्या कार्यक्रमाला एक हजारहून अधिक जण येणार असतील, तर त्यासाठी स्थानिक आपत्ती निवारस प्रशासनाची परवानगी गरजेची असेल.

३. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, मॉल आणि अन्य सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना उपस्थितीशी संबंधित नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागेल.

४. सार्वजनिक वाहतुकीत आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असेल. नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

५. सार्वजनिक ठिकाणं/ संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. नियम मोडणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई केली जाईल.

६. मास्कचा वापर, वारंवार हात धुणं, फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे. सर्व परिसर, शौचालयांची नियमित सफाई आणि सॅनिटायझेशन गरजेचं आहे.

Web Title: mumbai bmc announces new guidelines amid rising omicron cases in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.