Mumbai BMC Election 2022: मुंबई महानगरपालिकाच्या पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पक्षानं शड्डू ठोकला आहे. मुंबई महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. पण या पराभवाला पुसून टाकत आता २०२२ सालच्या निवडणुकीसाठी नव्यानं कामाला लागा, असे आदेश रामदास आठवले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. (Mumbai BMC Election 2022 RPI Leader Ramdas Athawale)
मुंबईतील एमआयजी क्लब येथे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या उद्देशाने पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत रामदास आठवले यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत २५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचा महापौर आणि आरपीआयचा उपमहापौर करण्यासाठी भाजपसोबतचे आरपीआयचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी जोरदार तयारीला लागा, असे आदेश रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. आगामी निवडणुकीत किमान २५ जागांवर आरपीआयचे उमेदवार निवडणून आणणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे.