Mumbai: शाळेच्या बसमध्ये मुलाला केली मारहाण, पवई पोलिस ठाण्यात वडिलांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2023 01:58 PM2023-04-19T13:58:10+5:302023-04-19T13:59:04+5:30

Mumbai News: पवई पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या घटस्फोटित महिलेने तिच्या पतीविरोधात मुलाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai: Boy assaulted in school bus, case against father in Powai police station | Mumbai: शाळेच्या बसमध्ये मुलाला केली मारहाण, पवई पोलिस ठाण्यात वडिलांवर गुन्हा

Mumbai: शाळेच्या बसमध्ये मुलाला केली मारहाण, पवई पोलिस ठाण्यात वडिलांवर गुन्हा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : पवई पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या घटस्फोटित महिलेने तिच्या पतीविरोधात मुलाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मधुबाला मिस्त्री (४३) यांचा २०२१ मध्ये पती मनिल शेट्टी यांच्यासोबत  घटस्फोट झाला. त्यांची मुलगी आणि मुलगा हे वडिलांकडे राहतात. मिस्त्री नेहमी मुलांना भेटण्यासाठी किंवा शनिवार-रविवार त्यांना स्वतःच्या घरी घेऊन येण्यासाठी जायच्या. मात्र, शेट्टी त्यासाठी फोनवर बोलण्यासाठीही टाळाटाळ करायचे. पती मुलांना भेटू देत नाही म्हणून अनेक वेळा पोलिस ठाण्यातही मिस्त्री यांनी धाव घेतली होती. दरम्यान, गोवंडीच्या गेटवे स्कूलमध्ये शिकणाऱ्या त्यांच्या १२ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ३ एप्रिल रोजी दोन्ही मुले त्यांच्या घरी येणार होती. पण, मुलगा शाळा सुटल्यावर आला नाही, म्हणून मिस्त्री यांनी पतीला फोन केला. मात्र, तो त्याने उचलला नाही. त्यामुळे त्यांनी बस चालकाला फोन केला, तेव्हा शेट्टी यांनी मुलाला पवई प्लाझा या ठिकाणी बसमधून उतरवून घेऊन गेले आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुलाने फोन करून तो वडिलांच्या मैत्रिणीच्या घरी आहे, असे सांगत रडायला सुरुवात केली. त्यानंतर मिस्त्री यांनी दोन्ही मुलांना स्वतःच्या घरी बोलाविले. मुलाचे टी-शर्ट काढल्यावर त्याच्या अंगावर मारहाण केल्याचे वळ होते. वडिलांनी हाताने मारहाण केली. पायाला पकडून बसच्या बाहेर खेचत जीवे मारण्याची धमकी दिली, असे मुलाने त्यांना सांगत वडिलांकडे परत जाण्यास नकार दिला. 

Web Title: Mumbai: Boy assaulted in school bus, case against father in Powai police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.