Join us

Mumbai : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उत्तरपत्रिका तपासणी वरील बहिष्कार मागे  

By सीमा महांगडे | Published: March 02, 2023 3:04 PM

Exam: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेतली. या सकारात्मक बैठकीनंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांवरील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेतली. या सकारात्मक बैठकीनंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांवरील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे

बारावी बोर्ड परीक्षा सुरू असताना आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. तो आता मागे घेण्यात आला असून लवकरच उत्तर पत्रिका तपासणीला सुरुवात होणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना, रिक्त असलेली पदे भरणे अशा विविध मागण्यांसाठी हा उत्तर पत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने पन्नास लाखापेक्षा अधिक उत्तर पत्रिका या तपासणीविना पडून होत्या... मात्र यातील बहुतांश मागण्या मान्य करून त्या संदर्भातील प्रस्ताव सादर केले जात असल्याने या सकारात्मक बैठकीनंतर शिक्षकांनी हे बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे

बहुतांश मागण्या बैठकीत मान्य झाल्यानंतर आणि विद्यार्थी हित लक्षात घेता आम्ही उत्तर पत्रिका तपासणी बहिष्कार आंदोलन मागे घेत असल्याचं आणि बारावी बोर्डाचा निकाल वेळेत लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिक्षकांनी यावेळी सांगितले

टॅग्स :परीक्षाशिक्षक