Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 11:41 AM2022-02-03T11:41:46+5:302022-02-03T14:14:39+5:30

मुंबई - महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी ...

Mumbai Budget 2022: 45 thousand 949.21 crore of Mumbai Municipal Corporation | Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

Mumbai Budget 2022: मुंबईत पुलांची दुरूस्ती अन् निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

Next

मुंबई - महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. 
 

LIVE

Get Latest Updates

03:04 PM

आयुक्त इकबाल चहल यांनी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला

02:13 PM

मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद

मुंबईत पुलांची दुरूस्ती आणि निर्मितीसाठी १५७६ कोटींची भरीव तरतूद. मुंबईतील नद्या्चे पुनरूज्जीवन  २०० कोटी तरतूद. दहिसर पोईसर ओशिवरा आणि वालभट्ट नद्यांचे पुनरूज्जीवन
मुंबईतील मलनि:सारण प्रकल्पांसाठी  (एसटीपी) - २०७२ कोटींची तरतुद

01:31 PM

हवामान बदल कृती आरखडा तयार करणार यासाठी 1 कोटी

मुंबईतील वाढत हवामान बदल यासाठी कृती आरखडा तयार करणार यासाठी 1 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात हवामान कक्ष उभारलं जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना

01:06 PM

अग्निशमन दलाच्या नवीन प्रकल्पांकरता ३६५ कोटी

मुंबई अग्निशमन दलाच्या नवीन प्रकल्पांकरता ३६५ कोटींचा निधी 
महापालिकेच्या मांड्याकरता १२१ कोटींचा निधी तरतुद
भायखळा राणी बागेच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारीकरण साठी ११५ कोटी
 

01:06 PM

महसुली उत्पन्नात वाढ करण्यासाठी पालिकेचे नवे मार्ग

अनधिकृत बांधकाम आढळल्यास मालमत्ता कराच्या दोन पट दंड आकारणी होणार

उत्पन्नवाढीसाठी मुंबईत  डिजीटल जाहिरातींच्या माध्यमांना परवानगी दिली जाईल

सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर इत्यादीपोटी शासनाच्या विविध कार्यालयांकडून ६७६८.१६ कोटी येणे बाकी

शिक्षण खात्याकडून सहाय्यक अनुदानापोटी ४८४०.६१ कोटी येणे बाकी

12:40 PM

बेस्ट उपक्रमासाठी केवळ 800 कोटींची तरतूद

बेस्ट उपक्रमाकडून सहा हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. मात्र अर्थसंकल्प केवळ आठशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे..गेल्यावर्षी ७५० कोटी तरतूद होती

12:37 PM

अर्थसंकल्पात कोणत्या प्रकल्पाला किती मिळाले

कोणत्या प्रकल्पाला किती मिळाले

१) मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प
पाहिजेत - ७ हजार ३७२ कोटी
मिळाले - ३ हजर २०० कोटी

२) गोरेगाव-मुलुंड लिंक रोड 
पाहिजेत - ७ हजार ८४७ कोटी
मिळाले - १ हजार ३०० कोटी

३) घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प - कचऱ्यापासून वीज निर्मिती
पाहिजेत - ६ हजार २०७ कोटी
मिळाले - १६७ कोटी

४) मुंबई मलनि:सारण प्रकल्प 
पाहिजेत - १५ हजार ६९३ कोटी
मिळाले - १ हजार ३४० कोटी

५) पिंजाळ प्रकल्प
पाहिजेत - १४ हजार ३९० कोटी
मिळाले - ३० लाख

६) जलवहन बोगदे
पाहिजेत - २ हजार ६५० कोटी 
मिळाले - ४६७ कोटी

७) सायकल ट्रॅक 
पाहिजे - ३०७ कोटी
मिळाले - ४५ कोटी

८) मोठ्या जलवाहिन्यांची कामे
पाहिजे - ३८७ कोटी 
मिळाले - २१० कोटी

९) चर विरहित व खुल्या चर पद्धतीने मलनिःसारण वाहिनी टाकणे 
पाहिजेत - ४२८ कोटी
मिळाले - २१९ कोटी

१०) मिठी नदी प्रकल्पाची कामे 
पाहिजेत - ४ हजार ०३३ कोटी
मिळाले - ५६५ कोटी

११) भगवती रुग्णालय
पाहिजेत - ४३५ कोटी
मिळाले -२५० कोटी

१२) एम.टी. अगरवाल रुग्णालय
पाहिजेत - ३२५ कोटी
मिळाले - ३०० कोटी

१३) आर.एन.कूपर रुग्णालय 
पाहिजेत - १२१ कोटी
मिळाले - ११६ कोटी

१४) पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, गोवंडी
पाहिजेत - ३८५ कोटी
मिळाले - १७५ कोटी

१५) एक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय
पाहिजेत - १४१ कोटी
मिळाले - ६० कोटी

१६) टाटा कंपाऊंड हॉस्टेल इमारत
पाहिजेत - १३ कोटी
मिळाले - ४ कोटी

१७) आश्रय योजना
पाहिजेत - ४ कोटी २५१
मिळाले - १ कोटी ३००

१८) वांद्रे भाभा रुग्णालय विस्तार
पाहिजेत - २४६ कोटी
मिळाले - १४० कोटी

१९) लो.टि.म.स. रुग्णालय
पाहिजेत - ५२४ कोटी
मिळाले - १६५ कोटी

२०) टोपीवाला मंडई
पाहिजेत - १३३ कोटी
मिळाले - २० कोटी

२१) नायर रुग्णालय दंत महाविद्यालय विस्तारित इमारतीसाठी
पाहिजेत - ७७ कोटी
मिळाले - ६२ कोटी

२२) सेंटिनरी रुग्णालय, कांदिवली
पाहिजेत - ३८३ कोटी
मिळाले - ४० कोटी
२३) सायन कोळीवाडा वसतिगृह
पाहिजेत - १६५ कोटी
मिळाले - ४५ कोटी

२४) नायर रुग्णालय
पाहिजेत - २२४ कोटी
मिळाले - ४० कोटी

२५) क्रातिवीर महात्मा फुले मंडई, टप्पा - २ पुनर्विकास
पाहिजेत - २६२ कोटी
मिळाले - ४० कोटी

२६) शिरोडकर मंडईचा पुनर्विकास
पाहिजेत - ८६ कोटी
मिळाले - २० कोटी

२७) नद्यांचे पुनरुज्जीवन
पाहिजेत - २ कोटी८३२
मिळाले - २०० कोटी

२८) सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास
पाहिजेत - २९५ कोटी
मिळाले - २५ कोटी

२९) एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी मनपा रुग्णालय
पाहिजेत - ४६४ कोटी
मिळाले - २५ कोटी

11:52 AM

सन २०२१-२२ च्या तुलनेत अर्थसंकल्पात १७.७० टक्के वाढ

सन २०२१-२२ च्या तुलनेत अर्थसंकल्पात १७.७० टक्के वाढ करण्यात आली आहे.

11:51 AM

कुठलिही करवाढ नाही, मुंबईकरांना दिलासा

अर्थसंकल्पात कोणतीही थेट करवाढ नाही, पायाभूत सुविधा आणि आरोग्यावर भर देणारा अर्थसंकल्प..

11:49 AM

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ₹२६६०.५६ कोटींची तरतूद

आरोग्य खात्यासाठी २०२१ २२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ₹११०२.३८ कोटी आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात ₹२६६०.५६ कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

कोविड-१९ च्या महामारीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेने या संकटावर मात करण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. दिनांक ३०.०९.२०२१ पर्यंतच्या झालेल्या खर्चापैकी ₹१४१७.३२ कोटी आणि ₹१३४७.५६ कोटी इतक्या खर्चाची अनुक्रमे जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा आणि जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांच्याकडे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) प्रतिपूर्तीची मागणी करण्यात आली आहे

11:48 AM

शिक्षण विभागासाठी 3370 कोटींचा अर्थसंकल्प

पालिका शिक्षण विभागाचा 2022-23 वर्षासाठी 3370 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

कोरोना काळातील शिक्षणासाठी ऑनलाईन माध्यमांचा वापर पालिका शिक्षण विभागाकडून सुरू असून विचारशील प्रयोगशाळा, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर तसेच धोकादायक शालेय इमारतींची दुरुस्ती करणे, मुख्याध्यापक अधिकाराचे विकेंद्रीकरण, माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आदी बाबींसाठी निधीची भरीव तरतूद करण्यात आली आहे

Web Title: Mumbai Budget 2022: 45 thousand 949.21 crore of Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.