Mumbai Budget 2022 : 46 हजार कोटींचा BMC चा अर्थसंकल्प, एका क्लिकवर आर्थिक लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:51 PM2022-02-03T14:51:39+5:302022-02-03T14:52:53+5:30

यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता

Mumbai Budget 2022: BMC's budget of Rs 46,000 crore, one-click financial audit | Mumbai Budget 2022 : 46 हजार कोटींचा BMC चा अर्थसंकल्प, एका क्लिकवर आर्थिक लेखाजोखा

Mumbai Budget 2022 : 46 हजार कोटींचा BMC चा अर्थसंकल्प, एका क्लिकवर आर्थिक लेखाजोखा

googlenewsNext

मुंबई - महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. कोविडचा परिणाम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, डिजिटल शिक्षणप्रणाली आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे अर्थसंकल्पातील तरतुदीवरुन दिसून आले. चहल यांनी निवडणुकीच्या काळातील हा मेगा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर केला. 

यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात १७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामध्ये, मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठीही भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी रस्ते, पुलनिर्मित्ती, नद्यांसाठी, मलनि:सारण, घनकचरा, रुग्णालये अशा विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे. 

कोणत्या प्रकल्पाला किती मिळाले

१) मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प
पाहिजेत - ७ हजार ३७२ कोटी
मिळाले - ३ हजार २०० कोटी

२) गोरेगाव-मुलुंड लिंक रोड 
पाहिजेत - ७ हजार ८४७ कोटी
मिळाले - १ हजार ३०० कोटी

३) घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प - कचऱ्यापासून वीज निर्मिती
पाहिजेत - ६ हजार २०७ कोटी
मिळाले - १६७ कोटी

४) मुंबई मलनि:सारण प्रकल्प 
पाहिजेत - १५ हजार ६९३ कोटी
मिळाले - १ हजार ३४० कोटी

५) पिंजाळ प्रकल्प
पाहिजेत - १४ हजार ३९० कोटी
मिळाले - ३० लाख

६) जलवहन बोगदे
पाहिजेत - २ हजार ६५० कोटी 
मिळाले - ४६७ कोटी

७) सायकल ट्रॅक 
पाहिजे - ३०७ कोटी
मिळाले - ४५ कोटी

८) मोठ्या जलवाहिन्यांची कामे
पाहिजे - ३८७ कोटी 
मिळाले - २१० कोटी

९) चर विरहित व खुल्या चर पद्धतीने मलनिःसारण वाहिनी टाकणे 
पाहिजेत - ४२८ कोटी
मिळाले - २१९ कोटी

१०) मिठी नदी प्रकल्पाची कामे 
पाहिजेत - ४ हजार ०३३ कोटी
मिळाले - ५६५ कोटी

११) भगवती रुग्णालय
पाहिजेत - ४३५ कोटी
मिळाले -२५० कोटी

१२) एम.टी. अगरवाल रुग्णालय
पाहिजेत - ३२५ कोटी
मिळाले - ३०० कोटी

१३) आर.एन.कूपर रुग्णालय 
पाहिजेत - १२१ कोटी
मिळाले - ११६ कोटी

१४) पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, गोवंडी
पाहिजेत - ३८५ कोटी
मिळाले - १७५ कोटी

१५) एक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालय
पाहिजेत - १४१ कोटी
मिळाले - ६० कोटी

१६) टाटा कंपाऊंड हॉस्टेल इमारत
पाहिजेत - १३ कोटी
मिळाले - ४ कोटी

१७) आश्रय योजना
पाहिजेत - ४ कोटी २५१
मिळाले - १ कोटी ३००

१८) वांद्रे भाभा रुग्णालय विस्तार
पाहिजेत - २४६ कोटी
मिळाले - १४० कोटी

१९) लो.टि.म.स. रुग्णालय
पाहिजेत - ५२४ कोटी
मिळाले - १६५ कोटी

२०) टोपीवाला मंडई
पाहिजेत - १३३ कोटी
मिळाले - २० कोटी

२१) नायर रुग्णालय दंत महाविद्यालय विस्तारित इमारतीसाठी
पाहिजेत - ७७ कोटी
मिळाले - ६२ कोटी

२२) सेंटिनरी रुग्णालय, कांदिवली
पाहिजेत - ३८३ कोटी
मिळाले - ४० कोटी
२३) सायन कोळीवाडा वसतिगृह
पाहिजेत - १६५ कोटी
मिळाले - ४५ कोटी

२४) नायर रुग्णालय
पाहिजेत - २२४ कोटी
मिळाले - ४० कोटी

२५) क्रातिवीर महात्मा फुले मंडई, टप्पा - २ पुनर्विकास
पाहिजेत - २६२ कोटी
मिळाले - ४० कोटी

२६) शिरोडकर मंडईचा पुनर्विकास
पाहिजेत - ८६ कोटी
मिळाले - २० कोटी

२७) नद्यांचे पुनरुज्जीवन
पाहिजेत - २ कोटी८३२
मिळाले - २०० कोटी

२८) सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकास
पाहिजेत - २९५ कोटी
मिळाले - २५ कोटी

२९) एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी मनपा रुग्णालय
पाहिजेत - ४६४ कोटी
मिळाले - २५ कोटी
 

Web Title: Mumbai Budget 2022: BMC's budget of Rs 46,000 crore, one-click financial audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.