मुंबई - महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण विभाग, आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद महापालिकेने केली आहे. कोविडचा परिणाम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे, डिजिटल शिक्षणप्रणाली आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आल्याचे अर्थसंकल्पातील तरतुदीवरुन दिसून आले. चहल यांनी निवडणुकीच्या काळातील हा मेगा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर केला.
यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात १७.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामध्ये, मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठीही भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे. सागरी रस्ते, पुलनिर्मित्ती, नद्यांसाठी, मलनि:सारण, घनकचरा, रुग्णालये अशा विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकल्पाला किती मिळाले
१) मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पपाहिजेत - ७ हजार ३७२ कोटीमिळाले - ३ हजार २०० कोटी
२) गोरेगाव-मुलुंड लिंक रोड पाहिजेत - ७ हजार ८४७ कोटीमिळाले - १ हजार ३०० कोटी
३) घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प - कचऱ्यापासून वीज निर्मितीपाहिजेत - ६ हजार २०७ कोटीमिळाले - १६७ कोटी
४) मुंबई मलनि:सारण प्रकल्प पाहिजेत - १५ हजार ६९३ कोटीमिळाले - १ हजार ३४० कोटी
५) पिंजाळ प्रकल्पपाहिजेत - १४ हजार ३९० कोटीमिळाले - ३० लाख
६) जलवहन बोगदेपाहिजेत - २ हजार ६५० कोटी मिळाले - ४६७ कोटी
७) सायकल ट्रॅक पाहिजे - ३०७ कोटीमिळाले - ४५ कोटी
८) मोठ्या जलवाहिन्यांची कामेपाहिजे - ३८७ कोटी मिळाले - २१० कोटी
९) चर विरहित व खुल्या चर पद्धतीने मलनिःसारण वाहिनी टाकणे पाहिजेत - ४२८ कोटीमिळाले - २१९ कोटी
१०) मिठी नदी प्रकल्पाची कामे पाहिजेत - ४ हजार ०३३ कोटीमिळाले - ५६५ कोटी
११) भगवती रुग्णालयपाहिजेत - ४३५ कोटीमिळाले -२५० कोटी
१२) एम.टी. अगरवाल रुग्णालयपाहिजेत - ३२५ कोटीमिळाले - ३०० कोटी
१३) आर.एन.कूपर रुग्णालय पाहिजेत - १२१ कोटीमिळाले - ११६ कोटी
१४) पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, गोवंडीपाहिजेत - ३८५ कोटीमिळाले - १७५ कोटी
१५) एक्वर्थ कुष्ठरोग रुग्णालयपाहिजेत - १४१ कोटीमिळाले - ६० कोटी
१६) टाटा कंपाऊंड हॉस्टेल इमारतपाहिजेत - १३ कोटीमिळाले - ४ कोटी
१७) आश्रय योजनापाहिजेत - ४ कोटी २५१मिळाले - १ कोटी ३००
१८) वांद्रे भाभा रुग्णालय विस्तारपाहिजेत - २४६ कोटीमिळाले - १४० कोटी
१९) लो.टि.म.स. रुग्णालयपाहिजेत - ५२४ कोटीमिळाले - १६५ कोटी
२०) टोपीवाला मंडईपाहिजेत - १३३ कोटीमिळाले - २० कोटी
२१) नायर रुग्णालय दंत महाविद्यालय विस्तारित इमारतीसाठीपाहिजेत - ७७ कोटीमिळाले - ६२ कोटी
२२) सेंटिनरी रुग्णालय, कांदिवलीपाहिजेत - ३८३ कोटीमिळाले - ४० कोटी२३) सायन कोळीवाडा वसतिगृहपाहिजेत - १६५ कोटीमिळाले - ४५ कोटी
२४) नायर रुग्णालयपाहिजेत - २२४ कोटीमिळाले - ४० कोटी
२५) क्रातिवीर महात्मा फुले मंडई, टप्पा - २ पुनर्विकासपाहिजेत - २६२ कोटीमिळाले - ४० कोटी
२६) शिरोडकर मंडईचा पुनर्विकासपाहिजेत - ८६ कोटीमिळाले - २० कोटी
२७) नद्यांचे पुनरुज्जीवनपाहिजेत - २ कोटी८३२मिळाले - २०० कोटी
२८) सिद्धार्थ रुग्णालयाचा पुनर्विकासपाहिजेत - २९५ कोटीमिळाले - २५ कोटी
२९) एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी मनपा रुग्णालयपाहिजेत - ४६४ कोटीमिळाले - २५ कोटी