मुंबई: पश्चिम उपनगरातील मालाडच्या पश्चिमेला असलेल्या मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते.
दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.
सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
दुर्घटनेतील मृतांची नावं-१. साहिल सरफराज सय्यद (९ वर्षे)२. आरिफा शेख (९ वर्षे)३. शफिक मोहम्मद सलीम सिद्दीकी (४५ वर्षे)४. तौसिफ शफिक सिद्दीकी (१५ वर्षे)५. एलिशा शफिक सिद्दीकी (१० वर्षे)६. अल्फिसा शफिक सिद्दीकी (दीड वर्षे)७. अफिना शफिक सिद्दीकी (६ वर्षे)८. इशरत बानो शफिक सिद्दीकी (४० वर्षे)९. रहिसा बानो रफिक सिद्दीकी (४० वर्षे)१०. तहेस सफिक सिद्दीकी (१२ वर्षे)११. जॉन इरान्ना (१३ वर्षे)
दुर्घटनेतील जखमींची नावं-१. मरीकुमारी हिरांगणा (३० वर्षे) प्रकृती गंभीर२. धनलक्ष्मी बेबी (३६ वर्षे) प्रकृती स्थिर३. सलीम शेख (४९ वर्षे) प्रकृती स्थिर४. रिझवान सय्यद (३३ वर्षे) प्रकृती स्थिर५. सूर्यमणी यादव (३९ वर्षे) प्रकृती स्थिर६. करीम खान (३० वर्षे) प्रकृती स्थिर७. गुलझार अहमद अन्सारी (२६ वर्षे) प्रकृती स्थिर