Mumbai Building Collapse : मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:21 AM2021-06-10T05:21:00+5:302021-06-10T05:38:46+5:30

Mumbai Building Collapse: मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Mumbai Building Collapse: Nine died, 8 persons injured after residential structures collapsed in New Collector compound, Malad West of Mumbai | Mumbai Building Collapse : मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

Mumbai Building Collapse : मुंबईतील मालवणी भागात इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण  जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. (11 died, 7 persons injured after residential structures collapsed in New Collector compound, Malad West of Mumbai. Residents from 3 nearby buildings evacuated as structures are not in good condition. Search & rescue operation for trapped people is in progress: BMC)

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण  जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.

दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.


दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तर मुंबईत बुधवारीपासून मान्सूनचे आगमन झाले. पावसाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. 


मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

1. साहिल सर्फराज सय्यद (पु) – 9 वर्ष
2. अरिफा शेख- 8 वर्ष
3. अज्ञात (पु) – 40 वर्षे
4. अज्ञात (पु)- 15 वर्षे
5. अज्ञात (स्त्री)- 8 वर्षे
6. अज्ञात (स्त्री) – 3 वर्षे
7. अज्ञात (स्त्री) – 5 वर्षे
8. अज्ञात (स्त्री) – 30 वर्षे
9. अज्ञात (स्त्री) – 50 वर्षे
10. अज्ञात (पु) – 8 वर्षे
11. जॉन इराना- 13 वर्ष

इमारत दुर्घटनेतील जखमी

  1. मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष 30
  2. धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष 56 (प्रकृती स्थिर)
  3. लीम शेख- वय वर्षे 49 (प्रकृती स्थिर )
  4. रिजवाना सय्यद- वय वर्ष 33(प्रकृती स्थिर)
  5. सूर्य मनी यादव- वय वर्षे 39 (प्रकृती स्थिर)
  6. करीम खान वय वर्ष- 30 (प्रकृती स्थिर)
  7. गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष 26 (प्रकृती स्थिर)

Web Title: Mumbai Building Collapse: Nine died, 8 persons injured after residential structures collapsed in New Collector compound, Malad West of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.