मुंबई - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना दिलासा दिला आहे. दिवाळीच्या निमित्तानं मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र हार्बर रेल्वेवर सीएसएमटी- चुनाभट्टी/ वांद्रे दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेपर्यंत सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी-सीएसएमटी मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 वाजेपर्यंत सेवा खंडित राहील. या कालावधीत पनवेल ते कुर्लासाठी काही विशेष लोकल चालवल्या जातील.
हार्बर रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा नाही
दरम्यान, इगतपुरी स्थानकात जम्बो मॅगाब्लॉक घेण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणेत नव्याने बदल करण्यासाठी मध्य रेल्वेकडून सकाळी 3.45 पासून ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे अनेक मेल, एक्स्प्रेस अर्धा तास ते सव्वा तास उशिराने धावतील. तर, एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, इगतपुरी-मनमाड-इगतपुरी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या रद्दएलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस
रविवार आणि सोमवारी -मुंबई-भुसावळ पॅसेंजर
रविवारी -भुसावळ-मुंबई पॅसेंजररविवारी - भुसावळ-सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसरविवारी - भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेसरविवारी - इगतपुरी-मनमाड-इगतपुरी पॅसेंजर