Join us

मुंबईत संयमी दिवा‌ळी साजरी;कोरोनाची चिंता विसरून लोकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 3:36 AM

Diwali in Corona: कोरोना संसगार्ची पार्श्वभूमी असली तरी खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. साहजिकच सामाजिक अंतराचे नियम धूळीस मिळाले होते.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  कोरोनाला हरविण्यासाठी यंदाच्या दिवाळीत फटाके फोडू नका; या मुंबई महापालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी आणि अभ्यंगस्नान अशी तिन्ही दिवशी मुंबईत फटाके वाजण्याचे प्रमाणात तुलनेने कमी दिसून आले.

तुरळक ठिकाणे किंवा तुरळक घटना वगळता मुंबईकरांनी ब-याचअंशी कोरोनावर विजय प्राप्त करण्यासाठी पर्यावरपूरक दिवाळी साजरी करण्यावर भर दिल्याने कोरोनाच्या निमित्ताने का होईना मुंबईकरांची अभ्यंगस्नानाची दिवाळी पहाट पर्यावरणपूरक झाल्याचे चित्र होते. फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे निघणा-या धूराचा कोरोना रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास होईल. त्यामुळे मुंबईकरांनी फटके फोडू नये, असे म्हणत मुंबई महापालिकेने लक्ष्मीपूजनचा दिवस वगळता फटके फोडण्यास बंदी घातली. लक्ष्मी पूजनासदेखील सौम्य फटाके फोडले जावेत, अशी सूचना केली. विशेष म्हणजे मुंबईकरांनी यंदा मुंबई महापालिकेचे ऐकले. वसुबारस, धनत्रोयदशी, अभ्यंगस्नान या तिन्ही दिवशी मुंबईकर फटाक्यांपासून दूर राहिले. चिमुकल्यांकडून सौम्य स्वरुपाच्या फटक्यांचा आनंद लुटला जात असला तरीदेखील हे प्रमाण कमी होते.

कोरोना संसगार्ची पार्श्वभूमी असली तरी खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. साहजिकच सामाजिक अंतराचे नियम धूळीस मिळाले होते. दिवाळी खरेदी संपवतानाच एकमेकांना दूरूनच दिवाळीच्या शभेच्छा दिल्या जात होत्या.सोने-चांदी वधारलेजळगाव : विजयादशमी व धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भाव कमी झालेल्या सोन्या-चांदीचे भाव लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वधारले. सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ होवून ते ५१ हजार ५०० रुपये प्रति तोळा तर चांदीच्या भावात एक हजार रुपययांनी वाढ होऊन ती ६४,५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचली.

टॅग्स :दिवाळीमुंबई