मुंबई सेंट्रल-करमाळी गणपती विशेष ट्रेन
By Admin | Published: July 8, 2016 01:39 AM2016-07-08T01:39:23+5:302016-07-08T01:39:23+5:30
पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त मुंबई सेंट्रल ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या दहा फेऱ्या होतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
मुंबई : पश्चिम आणि कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त मुंबई सेंट्रल ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या दहा फेऱ्या होतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
ट्रेन नंबर 0९00९ मुंबई सेंट्रल येथून सप्टेंबर महिन्याच्या १, ३, ६, ८, १0, १३ आणि १५ तारखेला 00.0५ वाजता सुटेल आणि करमाळी येथे त्याच दिवशी १५.00 वाजता पोहोचेल. तर ट्रेन नंबर 0९0१0 करमाळी येथून सप्टेंबर महिन्याच्या त्याच तारखांना २0.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३0 वाजता पोहोचेल.
या ट्रेनला बोरीवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेरनेम आणि थिविम स्थानकावर थांबा देण्यात येईल. ट्रेन नंबर 0९00९चे आरक्षण १0 जुलै रोजी सर्व आरक्षण वेबसाईटवर सुरू होईल. (प्रतिनिधी)