Join us  

मध्य रेल्वेवर २७ तासांचा ब्लॉक! कधी आणि कसा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक; मगच प्रवास करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 6:47 AM

मध्य रेल्वेवरील सर्वांत जुना पूल म्हणून कर्नाक पूल ओळखला जातो. हा पूल धोकादायक ठरविण्यात आल्याने २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद केला होता.

मुंबई :

मध्य रेल्वेवरील सर्वांत जुना पूल म्हणून कर्नाक पूल ओळखला जातो. हा पूल धोकादायक ठरविण्यात आल्याने २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद केला होता. आता या उड्डाणपुलाचे तोडकाम केले जाणार असून, मध्य रेल्वे गर्डर काढण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. शनिवारी (ता. १९) रात्री ११ पासून ते सोमवारी (ता. २१) मध्यरात्री २ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल.

रेल्वे सेवांवर परिणाम ब्लॉक कालावधीत लोकल सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाही. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांपर्यंतच धावतील. तेथूनच परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडील लोकल गाड्यांची संख्या कमी असेल.   हार्बर लाइनवरील अप आणि डाऊन मार्गालरील लोकल सेवा वडाळा रोड स्थानकापर्यंत असेल. तेथूनच माघारी फिरतील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे लोकल संख्या कमी संख्येने चालवल्या जातील. मध्य रेल्वेने मुंबई पालिकेला  ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बस चालविण्याची विनंती केली आहे.

असा असेल ब्लॉक  मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावर शनिवार रात्री  ११ पासून ते रविवार दुपारी ४ पर्यंत - १७ तासांचा ब्लॉक  अप आणि डाउन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ पासून ते रविवारी दुपारी ४ पर्यंत - १७ तासांचा ब्लॉक  अप आणि डाउन हार्बर मार्गावर शनिवारी रात्री ११ पासून ते रविवारी  रात्री ८ पर्यंत - २१ तासांचा ब्लॉक  सातवी मार्गिका आणि यार्ड : शनिवारी रात्री ११ पासून ते सोमवारी मध्य  रात्री २ पर्यंत - २७ तासांचा ब्लॉक 

या एक्स्प्रेस रद्द१९ नोव्हेंबर : पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस, हैदराबाद - मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस, अमरावती - मुंबई एक्स्प्रेस, सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, निजामाबादमार्गे,  कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, जबलपूर - मुंबई गरीबरथ

एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम ३६ रद्द गाड्या, ३५ शॉर्ट टर्मिनेशन गाड्या (दादर, पनवेल, नाशिक, पुणे), ३३ शॉर्ट ओरिजिनेशन (प्रामुख्याने दादर)

२० नोव्हेंबर : मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस, मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस,  मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस आणि मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई - जबलपूर गरीबरथ, मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई - मनमाड विशेष, मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस पनवेलमार्गे, मुंबई - आदिलाबाद एक्स्प्रेस, मुंबई - पुणे डेक्कन क्वीन, मुंबई - मनमाड पंचवटी एक्स्प्रेस,  मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई - अमरावती एक्स्प्रेस, मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, पुणे - मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, पुणे - मुंबई डेक्कन क्वीन, मनमाड - मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, पुणे - मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेलमार्गे,  मनमाड - मुंबई स्पेशल, जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस,  मुंबई - हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस,  पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस,  पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस आणि  नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस

२१ नोव्हेंबर : मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस,  मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस आणि  आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस रद्द असणार आहे. 

दादर, पनवेल, पुण्यावरून धावणारब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या ३५ पेक्षा जास्त मेल, एक्स्प्रेस गाड्या दादर, पनवेल आणि पुणे स्थानकांतून सुटणार आहेत. ज्यामध्ये मुंबई - चेन्नई एग्मोर एक्स्प्रेस, मुंबई - अमृतसर, महानगरी, मुंबई - मडगाव जनशताब्दी, मुंबई - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर रेल्वे स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. तर मुंबई- केएसआर बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई- तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस, मुंबई- गदग एक्स्प्रेस, मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस पुण्याहून सुटतील. 

३३ एक्स्प्रेसचा प्रवास अर्ध्यावरच सीएसएमटीकडे येणाऱ्या ३३ मेल- एक्स्प्रेस गाड्या या दादर, पुणे, नाशिक रोड आणि पनवेलपर्यंतच धावणार आहेत. ज्यात पुष्पक एक्स्प्रेस, हावडा - मुंबई एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कोणार्क एक्स्प्रेस पंजाब मेल, जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, विदर्भ एक्स्प्रेस, बिदर - मुंबई एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेससारख्या महत्त्वपूर्ण गाड्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वे