मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2021 06:45 AM2021-01-07T06:45:39+5:302021-01-07T06:45:50+5:30

सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

Mumbai Central Station will be renamed as Nana Shankarsheth Terminus | मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार

Next

लोकमत नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाच्या अशा मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरशेठ टर्मिनस असे नामांतर केले जाणार आहे. नामांतराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली असता, केंद्रीय गृहराज्‍यमंत्री नित्‍यानंद राय यांनी सकारात्मक उत्तर दिले असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.


सहा वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी राज्य आणि केंद्राला पत्र लिहून या नामांतराची मागणी केली होती. या मागणीला राज्यातील कॅबिनेटने मार्च महिन्यात मंजुरी दिली असून, आता केवळ केंद्राच्या मंजुरीची वाट पाहत असल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. याबाबत राज्य सरकारने विधिमंडळात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे लवकरच नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळेल, अशी आशा आहे, असे सावंत म्हणाले.

Web Title: Mumbai Central Station will be renamed as Nana Shankarsheth Terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.