मुंबई- बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निस्वार्थ भावनेने उभे असलेल्या आणि वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन ७२ व्या वर्षी सुद्धा बोरीवली येथील वृत्तपत्र विक्रेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पारदळे कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे. स्वतः ची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही पदरमोड करून मृत जखमींवर मानवतेच्या दृष्टिकोनातून ते मदत करतात.आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून आजही ते कार्यरत आहेत.
फलाटावर अनाथ म्हणून वावरणाऱ्यांना सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोनातून सहकार्य केले. अशावेळी अनेक संकटांचा धीराने सामना केला. पत्नी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता मुलगा आणि मुलींचा सांभाळ केला. स्वतः च्या प्रकृतीची तमा बाळगली नाही. आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून वयाच्या ७२ व्या वर्षी सुद्धा ते कार्यरत आहेत.
नारायण पारदळे यांना फन लीडर फौंडेशन, प्रबोधन गोरेगाव आणि कवितांगण परिवाराने गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात हजारोंच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वि. स. पागे अध्यासन केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या शुभहस्ते हा सत्कार कवितांगण परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार पंकज दळवी, ईशान संगमनेरकर, संदीप बाक्रे आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आयोजित केला होता. या ह्रुदय हेलावून टाकणाऱ्या सोहोळ्यास पारदळे यांची कन्या स्मिता पारदळे जंगम, जावई विजय जंगम हे आवर्जून उपस्थित होते.